'एखादा शब्द पकडणे चुकीचं...', बच्चू कडू यांच्याकडून इंदुरीकर महाराजांचे समर्थन

'एखादा शब्द पकडणे चुकीचं...', बच्चू कडू यांच्याकडून इंदुरीकर महाराजांचे समर्थन

इंदुरीकर महाराजांवर राज्य सरकार गुन्हा दाखल करणार नाही, अशी माहितीही बच्चू कडू यांनी दिली आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 17 फेब्रुवारी : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वादात सापडलेल्या इंदुरीकर महाराज यांचे समर्थन केलं आहे. 'नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईल असे नाही. इंदुरीकर महाराजांवर राज्य सरकार गुन्हा दाखल करणार नाही, अशी माहितीही बच्चू कडू यांनी दिली आहे.

'दोन तासांच्या भाषणात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो. तो माझ्याकडून किंवा इंदुरीकर महाराज यांच्याकडूनही जाऊ शकतो. आपल्या देशात एखादा शब्द पकडणे आणि तो दाखवणे ही चुकीची सवय लागली आहे, ती बदलणे गरजेचे आहे. कायद्या सगळ्यांसाठी सारखा आहे. त्यामुळे इंदुरीकरांनाही नोटीस दिली आहे. त्याची चौकशी होईल,' असंही बचू कडू म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले असून दोन्हीकडून आक्रमकपणे आपली बाजू मांडण्यात येत आहे. यामध्ये राजकीय पक्षांचे नेतेही मागे नाहीत.

उद्धव ठाकरेंसमोरच उफाळून आली शिवसेनेतील नाराजी, भास्कर जाधवांनी खासदाराचा हात झटकला

काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?

इंदुरीकर महाराज देशमुख हे सध्या आपल्या एका किर्तनातील वक्तव्यातून अडचणीत आले आहेत. 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी एका व्हिडिओमध्ये केल्याचं दिसलं होतं.

इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडिटी अ‍ॅक्ट अर्थात प्रसुतीपूर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे.

First published: February 17, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या