मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आम्ही उद्यापर्यंत वाट बघू, संप मागे न घेणाऱ्यांवर कडक कारवाई करु : अनिल परब

आम्ही उद्यापर्यंत वाट बघू, संप मागे न घेणाऱ्यांवर कडक कारवाई करु : अनिल परब

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा (ST Workers Strike) तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची (Salary Hike) घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत.

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा (ST Workers Strike) तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची (Salary Hike) घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत.

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा (ST Workers Strike) तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची (Salary Hike) घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 25 नोव्हेंबर : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा (MSRTC Employees Strike तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची (Salary Hike) घोषणा केली. पण या पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामगार संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. एसटी महामंडळाचं जोपर्यंत सरकारमध्ये विलीनीकरण (Merged) होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका कामगारांनी (Workers) मांडली आहे. तर दुसरीकडे सरकारने पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही जे कामगार उद्या सकाळपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत त्यांना कडक कारवाईला (Strict Action) सामोरं जावं लागेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

'तुटेपर्यंत ताणू नये, एकदा तुटलं तर जोडणार नाही'

"आम्ही आमचा निर्णय जाहीर केलाय. ज्या कामगारांना तो निर्णय मंजूर असेल ते कामगार कामावर येतील. ज्यांना मंजूर नसेल त्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. कामगारांनी कोणाची लिडरशीप स्वीकारावी हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त मी त्यांना एकच सांगू इच्छितो, तुटेपर्यंत ताणू नये. एकदा तुटलं तर जोडणार नाही. कारवाई आता किती कामगार येतील त्यावर ठरवू. निलंबित झालेले कामगार उद्या आले तर त्यांचे निलंबन मागे घेऊ", अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.

हेही वाचा- याला म्हणतात प्रामाणिकपणा, पर्यटकाचं 5 लाखाचं ब्रेसलेट परत करण्यासाठी केला 90 किमी प्रवास

'आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर  यांनी आंदोलन मागे घेतलं'

"विलीनीकरणाच्या बाबतीतील भूमिका स्पष्ट केली आहे. पगारवाढीच्या बाबतीत देखील सर्व लेखाजोखा मी कालच्या पत्रकार परिषदेत मांडलेला आहे. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्याशी काल दिवसभर झालेल्या चर्चेच्या अंती आम्ही या सगळ्या गोष्टी मांडल्या. त्यामुळे आज त्यांनी सरकारच्यावतीने जे काही मांडलं गेलं ते कर्मचाऱ्यांना सांगून आपलं आंदोलन मागे घेतलं आहे", असं परब म्हणाले.

'मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई थांबवायची असते'

"एक गोष्ट नक्की आहे, लढाई कशा पद्धतीने लढायची असते. मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई थांबवायची असते, असे साधारण संकेत असतात. काही कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत. ते आमच्याशी संपर्क साधत आहेत. सातत्याने ते सांगत आहेत की, आम्हाला कामावर यायचं आहे, आम्हाला सुरक्षा द्या. आज मी कामगारांना आवाहन केलं आहे जे कामगार गावी गेलेत त्यांनी कामावर यावं. जे कामगार मुंबईत आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावं. आम्ही उद्या सकाळपर्यंत किती कामगार येतात, किती येत नाही या सगळ्याचा अभ्यास करु. त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की कशाप्रकारे पुढे जायला पाहिजे", असं परब यांनी सांगितलं.

हेही वाचा- विषारी वायू पसरल्यानं दहशत, काही लोकांच्या डोळ्यात जळजळ तर डझनभर लोक बेशुद्ध

'12 आठवडे संप सुरु ठेवणे बरोबर नाही'

"जे विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे ती मागणी हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीसमोर आहे. या समितीला 12 आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे. 12 आठवडे संप करणं हे एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनादेखील परवडणारं नाही. त्यात या दोघांचं नुकसान होणार आहे. एसटी आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असताना सरकारने जे पाऊल उचललं त्यानंतर कामगारांनी तातडीने संप मागे घ्यावा. कामावर रुजू व्हावं. विलीनीकरणाच्या बाबतीत सरकारने जी भूमिका घेतली आहे, समितीने विलीनीकरणाचे आदेश दिले तर सरकार ते आदेश ताबडतब मान्य करेल. पण हा अहवाल यायला 12 आठवड्यांचा कालावधी आहे. या 12 आठवड्यांपर्यंत एसटी बंद ठेवणं हे बरोबर नाही. म्हणून सरकारने एकतर्फी वाढ दिलेली आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली.

'इतकी पगारवाढ आतापर्यंतच्या इतिहासात कधीच झाली नव्हती'

"सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाशी बोलून जी वाढ दिली आहे तितकी वाढ आतापर्यंतच्या इतिहासात कधीच झाली नव्हती. कामगारांच्या आज त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. पण ही वाढ अतिशय चांगली आहे. कामगार येऊ इच्छित आहेत. आमची अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. उद्या किती कामगार येतात ते पाहू. त्यानंतर निर्णय घेतला जाईल", असं अनिल परब यांनी सांगितलं.

First published: