इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याने नवा संभ्रम

इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याने नवा संभ्रम

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 24 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद झाला. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

'एमआयएमने कुठलंही लॉक लावलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला आदेश करावा मी त्यांच्या आदेशाचं पालनच करेन. आजही मी आंबेडकरांना वंचितचा सर्वेसर्वा मानतो. शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या आदेशाची वाट पाहत राहीन,' अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आधी जागावाटपावरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणाऱ्या जलील यांनी आता असं वक्तव्य केल्याने वंचित आघाडीचं सूत पुन्हा जुळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

MIM वंचितमधून बाहेर पडल्यानंतर आंबेडकरांनी केला होता गंभीर आरोप

'गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. 'एमआयएम'सोबत (MIM)युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,' अशी प्रतिक्रिया एमयाएमने साथ सोडल्यानंतर 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी बाळासाहेबांनी शुभेच्छाही दिल्या होत्या.

'लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 25 जागा मुस्लिम समाजातील उमेदवारांना देणार,' अशी घोषणा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली होती.

VIDEO: 'हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 02:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading