मनसेच्या नव्या भूमिकेनंतर MIM चा हल्लाबोल, जलील यांची राज ठाकरेंवर सडकून टीका

मनसेच्या नव्या भूमिकेनंतर MIM चा हल्लाबोल, जलील यांची राज ठाकरेंवर सडकून टीका

  • Share this:

सचिन जिरे, औरंगाबाद, 24 जानेवारी : राज ठाकरे यांच्या मनसेनं मराठीवरून आता हिंदुत्वाकडे आपला मोर्चा वळवल्यानंतर एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मशिदीवरुन भोंगे काढण्यासाठीही कायदा आणा. राज ठाकरे इतके वर्ष काय करत होते. त्यांना आताच भोंगे का काढावेसे वाटत आहेत?' असा सवाल करत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

'नागरिकत्व सुधारणा कायदा आणला आहे. मुसलमानांनी येथे राहिचे का नाही असं वातावरण केलं आहे. मशिदीवरुन भोंगे काढण्यासाठीही कायदा आणा. काही पुढाऱ्यांना वाटते जनतेला काही काळात नाही. हेच महाशय 'लाव रे तो व्हीडिओ' म्हणत अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बोलत होते. या दोन तीन महिन्यात काय झाले माहीत नाही. आताच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचा निर्णय झाला आहे. त्यामुळे झेंडा बदलला आहे. असे लोक येणार जाणार. पण देश संविधानावर चालतो,' असं म्हणत जलील यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे.

'500 कोटी द्या मुख्यमंत्री होऊन दाखवतो', प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

काय आहे राज ठाकरेंचा नवा अजेंडा?

राज ठाकरे हे हिंदुत्वाची भूमिका घेणार, मनसे कात टाकत नव्या अवतारात येणार अशी चर्चा गेली काही दिवस होत होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष मनसेचे राज ठाकरेंच्या भाषणाकडे लागलं होतं. राज ठाकरे यांनी नेहमीच्या आपल्या आक्रमक शैलीत भाषण करत मनसेची नवी भूमिका जाहीर केली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......" अशी केली.

तसंच 'मी मराठी आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन,' असा आक्रमक इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 04:40 PM IST

ताज्या बातम्या