शिवसेना-MIM आमने-सामने; खासदार इम्तियाज जलील यांनी मंदिर आंदोलन घेतलं मागे

शिवसेना-MIM आमने-सामने; खासदार इम्तियाज जलील यांनी मंदिर आंदोलन घेतलं मागे

राज्यातील धार्मिकस्थळ खुली करण्याच्या मागणीसाठी MIMचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 1 सप्टेंबर: राज्यातील धार्मिकस्थळ खुली करण्याच्या मागणीसाठी MIM चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाल्याचं मंगळवारी पाहायला मिळालं. खासदार इम्तियाज जलील हे शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करणार होते. मात्र, MIM च्या मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला शिवसेनेनं कडाडून विरोध केला. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी आपलं आजचं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा..VIDEO:राज हिंदुत्वाची भूमिका अधिकच गडद, औरंगाबादेत केलं शांती पाठाचं पठण

खासदार इम्तियाज जलील हे दुपारी दोन वाजता खडकेश्वर मंदिरात प्रवेश करणार होते. आंदोलनासाठी MIM चे कार्यकर्ते मंदिर परिसरात मोठ्या संख्येने उपस्थितही झाले होते. मात्र, मंदिर परिसरात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह त्यांचे कार्यकर्त्ये पोहोचले आहेत. मंदिर उघडण्यास शिवसेनेनं विरोध केला आहे. खडकेश्वर मंदिर हे हिंदुंच मंदिर आहे. खासदार जलील हे मुस्लिम आहेत. त्यामुळे ते हिंदुंच्या मंदिरात प्रवेश कसे करू शहतात, असा सवाल शिवसेना नेत्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिवसेना- MIM आमने-सामने आली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

आज (1 सप्टेंबर) हिंदू मंदिर आणि उद्या (2 सप्टेंबर) मशिद उघडणार असल्याचा इशारा खासदार जलील यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. या पार्श्वभूमीवर खडकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दुसरीकडे, दुपारपासून MIMचे कार्यकर्त्यांनी खडकेश्वर मंहिर परिसरात गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.

हेही वाचा...गौरव आर्यासोबत कोट्यवधींचा गुंतवणूक, कर्नाटकच्या आमदाराला ED चा समन्स

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचे कार्यकत्ये मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर मोठा तणाव येथे निर्माण झाला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी विनंती केल्यानंतर MIM च्या कार्यकर्ते मंदिर परिसरातून निघून गेले आहेत. आता खासदार इम्तियाज जलील हे उद्या मशिदमध्ये प्रवेशाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 1, 2020, 2:18 PM IST

ताज्या बातम्या