MIMच्या आमदाराने मुस्लीम आरक्षणाची याचिका घेतली मागे

MIMच्या आमदाराने मुस्लीम आरक्षणाची याचिका घेतली मागे

'आपण दाखल केलेल्या या याचिकेत संदर्भात राज्यातील मुस्लीम आमदारांनी पाठिंबा दिली नाही'

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 22 जानेवारी : मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यावे आणि मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी आज माघार घेतली आहे. त्यांनी या दोन्ही याचिका मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

केंद्र सरकारने आर्थिक मागास असलेल्या सवर्ण लोकांना 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. याचा फायदा देखील मुस्लिम समाजाला होईल. मात्र, याची स्पष्टता अजून होत नाही. त्यामुळे जलील यांनी दाखल केलेली याचिका ही मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुस्लीम समाजासाठी याचिका दाखल केली. परंतु, आपण दाखल केलेल्या या याचिकेत संदर्भात राज्यातील मुस्लीम आमदारांनी पाठिंबा दिली नाही, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.

===============================

First published: January 22, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading