मराठा आरक्षणाविरोधातील याचिका MIM आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे

मराठा आरक्षणाविरोधातील याचिका MIM आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी मुंबई उच्च न्यायलयात दाखल केलेली याचिका एमआयएम आमदारांनी मागे घेतली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी केला होता.

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण रद्द करावं. त्याचबरोबर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल रद्द करण्याची मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याचिकेद्वारे केली होती. आरक्षण देऊन सामाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटलं होतं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुस्लिमांचा विरोध नाही मात्र मुस्लिमांनाही 5 टक्के आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली होती.

मराठा आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज (सोमवार दि. 28 जानेवारी)सुनावणी झाली. तेव्हा आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मागे घेतली. मराठा आरक्षणावर राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

काय होती इम्तियाज जलील यांची मागणी?

- इम्तियाज जलील यांची मराठा आरक्षणाविरोधात याचिका

- न्या. गायकवाड आयोगाचा अहवाल रद्द करा

- मराठा आरक्षणाचा SEBC 2018 कायदा रद्द करा

- इम्तियाज जलील यांची अॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मराठा आरक्षण आणि कायदेशीर लढाई

मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याआधीही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली आहे.

याआधी आघाडी सरकारनेही मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण या आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्याने त्याला स्थगिती मिळाली होती. आता फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हे आरक्षणही कायद्याच्या कचाट्यात अडकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Special Report : पालघरमधून यावेळी कोण मारणार बाजी?

First published: January 28, 2019, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading