औरंगाबाद राडा : हिंदू नामर्द नाही, उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'ला ठणकावलं

औरंगाबाद राडा : हिंदू नामर्द नाही, उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'ला ठणकावलं

'संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमआयएमला चांगलंच ठणकावलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडा, यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. सभागृहात धुडगूस घालत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला. या गोंधळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून एमआयएमवर हल्लाबोल केला आहे. 'लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- जेथे औरंग्यास गाडले किंवा पुरले त्या संभाजीनगरात हिरव्या विषाला पुन्हा उकळी फुटली आहे. महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली 30 वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत गुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले.

(पाहा :VIDEO : SCO परिषदेत इम्रान खान चुकले, जगभरातून होतेय निंदा)

- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘ओवेसी’ पक्षाच्या औरंगाबादी नगरसेवकांनी गोंधळ घातला. खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा राडा सुरू झाला. झोंबाझोंबी व राजदंड पळवून नेण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले. ओवेसी पक्षाचा पालिकेतील नेता नासेर सिद्दिकी याचे वर्तन एखाद्या गुंडासारखे होते. त्याला व त्याच्या सोबत गुंडागर्दी करणाऱ्या नगरसेवकांना अक्षरशः उचलून आणि फरफटत बाहेर काढावे लागले. सभागृहात अभूतपूर्व गोंधळ लोकांच्या प्रश्नांवर किंवा राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ावर झाला नाही, तर जलील यांच्या अपघाती विजयाचे अभिनंदन करावे यासाठी होता. हा गोंधळ पाहून त्याच मातीत गाडलेला औरंगजेबही कबरीतून आनंदाने टाळ्या वाजवीत असेल व ज्यांच्यामुळे हा विजयी अपघात घडून संभाजीनगरवर हिरवा फडकला त्या ‘कन्नड’च्या खानासाठी अल्लाकडे दुवा मागत असेल.

(पाहा :VIDEO : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर फडणवीस पोहोचले 'मातोश्री'वर!)

- कन्नडच्या खानांसारखे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ आमच्यातच निपजल्यावर धर्मांधांची विषवल्ली फोफावणारच. संभाजीनगरच्या महापालिकेत नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विजयी खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव येत असताना ओवेसी पक्षाचे मियाँ जलील यांचा स्वतंत्र अभिनंदन ठराव घ्यावा हा हट्ट कशासाठी?

- जलील यांनी आपण औरंगाबादचे नव्हे, तर संभाजीनगरचे खासदार आहोत हे मान्य करावे.

- महापालिकेत ‘ओवेसी’ पक्षाच्या नगरसेवकांनी ‘वंदे मातरम्’चे सूर आळवावेत.

- ट्रिपल तलाकबाबत मोदी सरकारने घेतलेल्या मानवतावादी भूमिकेस पाठिंबा द्यावा.

- कश्मीरातील 370 कलम हटवणे, देशभरात समान नागरी कायदा लागू करणे अशा राष्ट्रीय मुद्दय़ांवर पाठिंबा द्यावा. हे राष्ट्रीय मुद्दे असून त्यांस पाठिंबा देणाऱ्यांचाच अभिनंदन ठराव संभाजीनगर पालिकेत मंजूर होईल.

- लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या घरात घुसून अतिरेक्यांना मारले तेच आक्रमण आम्हालाही शक्य आहे. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे.

SPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन?

First published: June 15, 2019, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading