मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जाता पंढरीसी सुख वाटे जीवा! आषाढी यात्रेच्या आठवडाभर आधीच पंढरपुरात ही परिस्थिती, एकादशीला भाविकांच्या संख्येचा विक्रम होणार

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा! आषाढी यात्रेच्या आठवडाभर आधीच पंढरपुरात ही परिस्थिती, एकादशीला भाविकांच्या संख्येचा विक्रम होणार

येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. मात्र, त्याआधीच पंढरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. मात्र, त्याआधीच पंढरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. मात्र, त्याआधीच पंढरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

पंढरपूर, 4 जुलै : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी (Pandharpur Vithhal Rukmini) हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला (Ashadhi Wari 2022) सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. मात्र, त्याआधीच पंढरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

यंदा पंढरपुरात भाविकांच्या संख्येचा विक्रम होणार -

आषाढी यात्रेसाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक सध्या पंढरपूरकडे येत आहेत. आषाढी एकादशीला आठवड्याचा अवधी असताना आताच पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्राशेडमध्ये पोहोचली आहे. दरवेळी पालखी सोहळे पंढरपूरजवळ आल्यावर दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचत असते. मात्र, यावर्षी अजून पालख्या जिल्ह्यात येण्यापूर्वीच भाविकांच्या गर्दीने विक्रम गाठला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने यावर्षी पंढरपुरात होणाऱ्या यात्रेत भाविकांच्या संख्येचा विक्रम होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अशी आहे व्यवस्था -

विठुरायाच्या दर्शनाची रांग मंदिराजवळील सात माजली दर्शन मंडपातून विणे गल्ली मार्गे चंद्रभागा तीरावरून गोपाळपूर येथे उभारलेल्या 10 पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. या पत्राशेडच्या पुढे जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्वेरि इंजिनियरिंग कॉलेजपर्यंत बांबूचे शेड बांधून दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. तर गरज पडल्यावर ही लांबी अजून वाढवण्यात येणार आहे.

हेही वाचा - भक्तीने भरलेला रिंगण सोहळा, पाहावा याचि देही याची डोळा; तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण इंदापुरात संपन्न

दर्शनाला आजच लागतोय दहा तास कालावधी -

या दर्शन रांगेवर पत्र्याचे आवरण घातल्याने पावसातही भाविक भिजणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या शेवटच्या तीन दिवसांत दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला चहा, नाश्ता आणि भोजन देण्याची व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. यासाठी दोन मोठे देणगीदार पुढे आले आहेत, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिलीत. तर सध्या दर्शन रांगेत पन्नास हजारांपेक्षा जास्त भाविक असून आज दर्शनासाठी 8 ते 10 तास एवढा कालावधी लागणार आहे.

आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील (Pandharpur) लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी (Warkari) पायी चालत पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) करतात. हा दिवस महाराष्ट्रत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिण्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी (Ashadi Ekadashi 2022 Date) आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संत महंतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची पूजा (Ashadhi Ekadashi Vrat) करून उपवास करतात.

First published:

Tags: Ashadhi Ekadashi, Pandharpur, Wari