इतक्या रुपयांनी कमी होणार गायीच्या दुधाचा दर !

इतक्या रुपयांनी कमी होणार गायीच्या दुधाचा दर !

राज्यातल्या खासगी दूध संघांनी याबाबतचा निर्णय घेतलाय.

  • Share this:

मुंबई, 15 जून : राज्यातल्या गायीच्या दूधाचा दर 4 रुपयांनी कमी होणार आहे. राज्यातल्या खासगी दूध संघांनी याबाबतचा निर्णय घेतलाय. येत्या 2 दिवसांत मुंबईमध्ये याबाबत खासगी दूध संघांची एक बैठक होणार असून त्यात हा निर्णय घोषित केला जाण्याची शक्यता आहे.

मात्र या निर्णयामुळं राज्यातल्या सहकारी दूध संघांचे धाबे दणाणले आहेत. १६ जूनपासून गायीच्या दुधाचा विक्रीदर चार रुपयांनी कमी करण्याचा निर्णय खासगी दूध संघांनी घेतलाय. त्यामुळे सध्या ४२ रुपये लिटर दराने मिळणारे दूध ३८ रुपयांना मिळणार आहे.

दुधाची उपलब्धता वाढल्याने संघांना कमी दराने दूध मिळतंय, त्यामुळेच ग्राहकांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण दुधाच्या विक्रीमध्ये ४० टक्के दूध खासगी संघांचे असून वेगवेगळ्या ४५ ब्रॅण्डन ते वितरित केल जात. त्याचा प्रतिलिटरचा दर सध्या ४२ रुपये आहे.

हाच का पुरोगामी महाराष्ट्र? विहिरीत पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड

सरकारनं शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गाईच्या दुधाचा २७ रुपये एवढा दर निश्चित केलाय. मात्र सध्या दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध असून दुधाच्या पावडरीचे दरही कोसळले आहेत. त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या दरान दूध घेणं परवडत नसल्याच सांगत सर्रास संघ हे १९ ते २४ रुपये दराने दुधाची खरेदी करत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर खासगी दूध संघांची एक बैठक झाली असून दुधाची विक्री दर चार रुपयांनी कमी करण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे खासगी दूध संघांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

हेही वाचा...

आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार

मुंबईकरांनो, आता तुमचं पाणीही महागलं ! अशी आहे दरवाढ

मुंबई-पुणे महामार्गावर अॅक्टिव्हा जळून खाक

First published: June 15, 2018, 8:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading