• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण, 2 लाख लुटले, विरारमधील घटना LIVE VIDEO

बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण, 2 लाख लुटले, विरारमधील घटना LIVE VIDEO

विरार पूर्वेच्या (virar east) गणपती मंदिरासमोर दूध व्यावसायिक शिवकुमार सिंग यांचे 'जीवदानी मिल्क सेंटर' नावाचे दुकान आहे.

  • Share this:
विरार, 23 जुलै : मुंबईजवळील विरारमध्ये (Virar) एका दूध व्यावसायिकाला (Milk seller) 8 ते 10 तरुणांच्या जमावाने जबर मारहाण करून बंदुकीच्या (gun) धाकाने त्याकडून दोन लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv video) कैद झाला आहे. या मारहाणीत दूध व्यावसायिकाला गंभीर दुखापत झाली आहे. विरार पूर्वेच्या (virar east) गणपती मंदिरासमोर दूध व्यावसायिक शिवकुमार सिंग यांचे 'जीवदानी मिल्क सेंटर' नावाचे दुकान आहे. विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात दूध वितरण केल्याच्या रागातून आरोपी रंजन पाटील आणि दिनेश पाटील याने हे कृत्य केले आहे. दोघांनी आपल्यासोबत आठ ते दहा जणांना घेऊन शिवकुमार यांच्या दुकानावर पोहोचले. त्यानंतर बंदुकीच्या धाकावर मोकाळ्या मैदानात घेऊन आले. त्यानंतर तिथे जबर मारहाण केली. या टोळक्याने शिवकुमार यांना लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. यावेळी या टोळक्याने शिवकुमार यांच्या खिशातून दोन लाख रुपये काढून घेतले. तसंच, याबद्दल कुणाला सांगितल्यास बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. 8 ते 10 जणांनी केलेल्या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. Mumbai Goa Highway: वाशिष्ठी नदीवरचा ब्रिटीश कालीन पूल खचला, पाहा PHOTOS घडलेल्या या प्रकारानंतर शिवकुमार यांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात रंजन पाटील व दिनेश पाटील यांच्या सह इतर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: