दूध कोंडी फुटली, 25 रूपयांचा दर देणं दूध संघाला बंधनकारक

दूध कोंडी फुटली, 25 रूपयांचा दर देणं दूध संघाला बंधनकारक

गेल्या 4 दिवसांपासून राज्यभर सुरू असलेली दूध कोंडी फुटली आहे. सरकारनं संपूर्ण राज्यात दुधाला 25 रूपये दर जाहीर केला आहे हा दर सर्व दूध संघाला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

  • Share this:

नागपूर,ता.19 जुलै : गेल्या 4 दिवसांपासून राज्यभर सुरू असलेली दूध कोंडी फुटली आहे. सरकारनं संपूर्ण राज्यात दुधाला 25 रूपये दर जाहीर केला आहे हा दर सर्व दूध संघाला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 21 तारखेपासून शेतकऱ्यांना हा नवा दर मिळणार आहे. सरकार पाच रूपयांचं अनुदान दूध संघाला देणार आहे. गुरूवारी नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दूध दरवाढीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती आणि विरोधी पक्षनेते हजर होते. आतापर्यंत दूधासाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर 17 रूपये दर मिळत होता. तर दूध आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या राजू शेट्टींनी 5 रूपये अनुदानाची मागणी केली होती. मात्र सरकारनं 5 रूपये अनुदानाऐवजी दरात 8 रूपयांची वाढ केली आहे. या निर्णयामुळं आंदोलन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.

वारणा चे अध्यक्ष विनय कोरे यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असून अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची अट मान्य करणं शक्य नव्हतं असं मतही कोरे यांनी व्यक्त केलं. गेल्या पाच दिवसांपासून दूध बंदचं आंदोलन सुरू होतं. मुंबईसह मोठ्या शहरांचा दूध पुरवढा बंद करण्यासाठी खासदार राजू शेट्टी पालघरमध्ये गुजरात हायवेवर ठाण मांडून बसले होते.

हेही वाचा...

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा डाव

आरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या

धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क

बिग बाॅस मराठीत मेघा का वागते आक्रमक?

 

First published: July 19, 2018, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading