शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, दुधाच्या दरात 3 रूपयांची वाढ

शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, दुधाच्या दरात 3 रूपयांची वाढ

गायीचे दूध दर 24 वरून 27 रुपये तर, म्हैशीचे दूध दर 33 वरून 36 रुपये करण्यात आले आहे

  • Share this:

19 जून : दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला अखेर यश आलं आहे. दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपये वाढ करण्यात आलीये अशी घोषणा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली.

गायीचे दूध दर 24 वरून 27 रुपये तर, म्हैशीचे दूध दर 33 वरून 36 रुपये करण्यात आले आहे. पदुम विभाग सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने या दूध दरवाढीला मान्यता दिलीये.

याबद्दल दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरात वाढ केली असली तरी ग्राहकांचे हित लक्षात घेवून दूध विक्री दरात वाढ नाही. तसे निर्देश सर्व दूधसंघांना देण्यात आले आहेत. जर दूधसंघांनी निर्देश पाळले नाही  तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. तसंच  महागाई निर्देशांक जसा वाढेल तसे दुधाचे दर वर्षातून एकदा वाढेल असंही जानकरांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 04:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading