मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडावर अभिषेक करून मोदी सरकारचा केला निषेध

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडावर अभिषेक करून मोदी सरकारचा केला निषेध

मात्र, हे आंदोलन करत असताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.

मात्र, हे आंदोलन करत असताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.

मात्र, हे आंदोलन करत असताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.

  • Published by:  sachin Salve

अहमदनगर, 20 जुलै :  महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे ठाकलेले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी  शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे दूधाला दर मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.  दुधाला 30 रुपये भाव द्या या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.  मात्र, हे आंदोलन करत असताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.

पुणेकरांनो, काळजी घ्याच! पुण्यातील रुग्णालयांबाबत धक्कादायक चित्र समोर

डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार, असल्याचंही संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

शेतकरी संघटनेच्या काय आहे मागण्या?

- दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर  द्या.

- केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या

- दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा.

या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  कोल्हापूर आणि सांगलीतही आंदोलनाची सुरुवात झाली आहे, अशी माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिली.

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे हाल,रत्नागिरीतला धक्कादायक प्रकार

तर दुसरीकडे,  अकोले येथे संघर्ष समितीचे आंदोलन सुरू झाले आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत

रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.

First published:

Tags: अजित नवले, दूध आंदोलन