कांद्यानंतर आता दुधाची बारी, आता मोजावे लागणार इतके पैसे!

कांद्यानंतर आता दुधाची बारी, आता मोजावे लागणार इतके पैसे!

आधीच कांद्याचे दर गगणाला भिडले आहे. आता दूध दरवाढीमुळे खिश्याला आणखी कात्री बसणार आहे.

  • Share this:

पुणे, 14 डिसेंबर : एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. आता सर्वसामान्यांच्या खिश्याला आणखी कात्री बसणार आहे. दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ होणार आहे.

पुण्यात आजपासून दुग्ध व्यवसायाशी संबंधीत प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.  काञज डेअरीमध्ये हे प्रदर्शन भरलंय. दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दूध उत्पादक संघटनेची बैठक आज पडली. या बैठकीमध्ये पिशवीतलं दूध 2 रुपयांनी महागल्याची घोषणा करण्यात आली. येत्या 16 तारखेपासून प्रती लिटर दोन रुपये दरवाढ करण्यात आली आहे.

जो दर आहे त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचं निर्णय घेण्यात आला आहे.  दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने दूध विक्रीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

आधीच कांद्याचे दर गगणाला भिडले आहे. कांद्याच्या भावांनी शंभरी पार केल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. आता दूध दरवाढीमुळे खिश्याला आणखी कात्री बसणार आहे.

राज्य सरकारने दूध अनुदानामध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रतिलिटरमागे  ३ रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रूपये नुकसान सहन करावे लागत होते. दूध उत्पादकांनी प्रति लिटर 5 रूपये वाढ करावी अशी मागणी केली होती, परंतु,याबद्दल कोणताही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे आता दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सोमवारपासून सर्वच ब्रँडच्या दुधाच्या दरात 2 रूपये जास्त मोजावे लागणार आहे.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2019, 9:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading