VIDEO : आणि 'त्यांनी' दूध संकलन अधिकाऱ्याला चक्क दुधाने आंघोळ घातली!

VIDEO : आणि 'त्यांनी' दूध संकलन अधिकाऱ्याला चक्क दुधाने आंघोळ घातली!

चिखली येथे शासकीय दूध संकल केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दूध खरेदीस नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या दुधानेच त्या अधिकाऱ्याला आंघोळ घातली.

  • Share this:

बुलढाणा, 30 ऑगस्ट : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शासकीय दूध संकल केंद्र असून याठिकाणी शासनाच्या हमी भावानुसार शेतकऱ्याकड़ून दूध खरेदी केली जाते. परंतु आज येथल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता दूध खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क विक्रीसाठी आणलेल्या दुधानेच अधिकाऱ्याला आंघोळ घालत अनोखे आंदोलन केले.

चिखली येथील शासकीय दूध डेअरीच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणारं दूध अगोदर भंडारा येथील शासकीय दूध डेअरीला देण्यात येत होतं. परंतु तेथील डेअरी बंद पडल्यामुळे आता चिखलीच्या दूध डेअरीत संकलित होणारं दूध वारणा डेअरीला पाठविलं जाऊ लागलं. त्याठिकाणी दुधावर प्रक्रिया करून त्यापासून दूध पावडर बनविण्यात येत होती. मात्र, हे अंतर जास्त असल्याने तिथपर्यंत पोहोचेस्तोवर दूध खराब होत असल्याने आणि त्यातून हवे असलेले फॅट्स मिळत नसल्याने शासनादेशानुसार दूध खरेदी बंद करण्यात आली असल्याचे चिखलीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुठलीही पूर्व सूचना न देता दूध खरेदी बंद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दूध संकलन अधिकाऱ्याला विक्रीसाठी आणलेल्या दुधाने आंघोळ घातली. यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. शासनाला चिखलीची शासकीय दूध डेअरी बंद करायची असून, त्यासाठी बुलढाणा जिल्हा दूध डेअरी संघाच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता पिंपळगावकर विविध देत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

 VIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा

First published: August 30, 2018, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading