मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मातोश्री'ला आणखी एक धक्का? उद्धव ठाकरेंची सगळ्यात जवळची व्यक्ती शिंदेंकडे जाणार!

'मातोश्री'ला आणखी एक धक्का? उद्धव ठाकरेंची सगळ्यात जवळची व्यक्ती शिंदेंकडे जाणार!

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले आहेत. 40 आमदार, 12 खासदारांसह अनेक शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. या पाठिंब्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरच दावा ठोकला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मिलिंद नार्वेकर येत्या काळात शिवसेनेत येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसंच एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं तर ठाकरेंकडे 15 पैकी 5 आमदारही शिल्लक राहणार नाहीत, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिंदे नार्वेकरांच्या घरी

एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवामध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हापासून नार्वेकरांच्याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शिवसेनेमध्ये याआधी झालेल्या बंडावेळी अनेकांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करत शिवसेनेची साथ सोडली होती. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

54 वर्षांचे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचं राजकीय सल्लागार मानले जातात. राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडताना नार्वेकर यांना जबाबदार धरलं होतं. 2018 साली मिलिंद नार्वेकर यांना शिवसेना सचिव म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

याआधी नवरात्राच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असलेले चंपासिंग थापा आणि बाळासाहेबांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक मोरेश्वर राजे यांनीही एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.

दसरा मेळाव्यात कुणाचे प्रवेश?

अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छूक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील, असा गौप्यस्फोट काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. 5 ऑक्टोबरला वांद्र्याच्या बीकेसी मैदानात एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होणार आहे. तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray