काँग्रेसला आणखी एक धक्का, मिलिंद देवरांकडून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेसला आणखी एक धक्का, मिलिंद देवरांकडून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी मिलिंद देवरा हे दिल्लीत जाऊ शकतात. राजीनाम्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीच्या प्रभाव असं दुहेरी आव्हान काँग्रेससमोर निर्माण झालं आहे. देवरा यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, 26 जून रोजी मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांना दिल्लीत भेटल्यानंतर त्यांनी लवकरच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायकमांडनं संजय निरुपम यांची उचलबांगडी करत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्या खांद्यावर सोपवली होते. मिलिंद देवरा यांनी स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या जागेवर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

First published: July 7, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading