• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO: डोंबिवलीत MIDCची पाईप लाईन फुटली; रस्त्यावर गुडघाभर पाणी, ऐन उन्हाळ्यात पूरस्थिती

VIDEO: डोंबिवलीत MIDCची पाईप लाईन फुटली; रस्त्यावर गुडघाभर पाणी, ऐन उन्हाळ्यात पूरस्थिती

Water pipeline busted in Dombivli: ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.

  • Share this:
डोंबिवली, 28 मे: शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली शहरात (Dombivli) अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पहायला मिळालं. झालं असं की, डोंबिवली पूर्व येथून ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटली (MIDC pipeline busted in Dombivli). ही पाईप लाईन फुटल्याने अवघ्या काही क्षणातच संपूर्ण परिसरात पाणीच पाणी वाहू लागले. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची 1772 मिमी व्यासाची पाईप लाईन कल्याण शीळ रोड काटई नाका जवळ शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फुटली. यावेळी या पाईप लाईन मधून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरु असल्याने काही वेळातच रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. Oxygen तुटवड्याचा फटका मुंबई मेट्रोला सुद्धा; मात्र प्लाझ्माने दिली संजीवनी तेथील व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत ज्यामध्ये दिसत आहे की, नागरिक गुडघाभर पाण्यातून वाट काढत आहेत. तसेच वाहनांची चाकेही पाण्यात बुडल्याचं पहायला मिळत आहे. रस्त्यावरील वाहने जवळपास पाण्यात बुडाल्याने वाहने जागच्या जागी थांबविण्यात आल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. एमआयडीसी कडून घटनेची माहिती मिळताच तातडीने पाणी पुरवठा बंद केला असला तरी पाण्याचा वेग जास्त असल्याने हे पाणी पाईप लाईन शेजारी असलेल्या दुकान मध्ये पाणी शिरले. पाणी फुटून रस्त्यावर आणि दुकानांत पाणी शिरल्याने सर्वांचीच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं.
Published by:Sunil Desale
First published: