बेपर्वाईचा कहर! शालेय आहारात दिलेल्या खिचडीत मेलेला उंदीर VIDEO VIRAL; 9 विद्यार्थी रुग्णालयात

बेपर्वाईचा कहर! शालेय आहारात दिलेल्या खिचडीत मेलेला उंदीर VIDEO VIRAL; 9 विद्यार्थी रुग्णालयात

प्राथमिक शाळेतल्या मुलांना देण्यासाठी तयार केलेल्या खिचडीत चक्क मेलेला उंदीर आढळला. ही खिचडी खाल्ल्याने 9 मुलांची तब्येत बिघडली आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

लखनौ, 3 नोव्हेंबर : मुलांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू झालेला मध्यान्ह भोजन कार्यक्रम बऱ्याचदा निकृष्ट दर्जा, भ्रष्टाचार आदी कारणांनी वादाच्या भोवऱ्यात असतो. सरकारी शाळांमध्ये मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा नेहमीच वादात असतो, पण आज व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं मात्र बेपर्वाईचा कहर डोळ्यासमोर आला. प्राथमिक शाळेतल्या मुलांना देण्यासाठी तयार केलेल्या खिचडीत चक्क मेलेला उंदीर आढळला. ही खिचडी खाल्ल्याने 9 मुलांची तब्येत बिघडली आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे. मुस्तफाबाद भागातल्या जनता इंटर कॉलेज सरकारी शाळेत मंगळवारी सकाळी मुलांना देण्यात आलेल्या खिचडीत मेलेला उंदीर दिसला. जन कल्याण सेवा समिती या हापूर इथल्या संस्थेतर्फे या शाळेला मध्यान्ह भोजन पुरवलं जातं.

मुलांना डब्यात खिचडी देण्यात आली होती. ही खिचडी खाल्ल्यानंतर लगेच काही मुलांना त्रास जाणवू लागला. मळमळायला लागलं. लगोलग त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि मग त्यांना खायला देण्यात आलेल्या अन्नाची तपासणी झाली. त्या वेळी खिचडीत मेलेला उंदीर दिसून आला.

वाचा - मातेला सलाम! रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बालकाचे स्वीकारले पालकत्व

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. अजून या घटनेचा तपास पूर्ण झालेला नाही. पण बेपर्वा कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्य़ात येणार असल्याचं सांगितलं आहे.

वाचा - कॅप्टन कुलच्या अडचणीत वाढ, एम. एस धोनी विरोधात गुन्हा दाखल

गेल्याच आठवड्यात सोनभद्रमध्ये एका शाळेत पोषण आहारात देण्यात येणाऱं दूध पाणी मिसळून देत असल्याचं उघड झालं होतं. त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुधात भेसळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

-----------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या