पर्यटकाने फिडबॅक फॉर्मवर लिहिले असे काही की सगळ्यांना आठवले देवेंद्र फडणवीस!

पर्यटकाने फिडबॅक फॉर्मवर लिहिले असे काही की सगळ्यांना आठवले देवेंद्र फडणवीस!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ' मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', हे वाक्य सोशल मीडियावर चांगलेच गाजले. पण अजूनही त्याची चर्चा थांबलेली नाही

  • Share this:

भंडारा, 07 डिसेंबर : 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा जनादेश पाहता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ' मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', हे वाक्य सोशल मीडियावर चांगलेच गाजले. पण अजूनही त्याची चर्चा थांबलेली नाही.  नुकतेच भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यात भ्रमंतीसाठी आलेल्या एका पर्यटकाने फिडबॅक फॉर्मवर चक्क 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असा अभिप्राय दिला. याबद्दलचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

भंडारा -गोंदिया जिल्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोका अभयारण्याचा समावेश आहे. वाघ, बिबट, अस्वल, हरीण, नीलगाय या वन्यप्राण्यांसह सुमारे २०० प्रकारचे पक्षी, ५० प्रकारची फुलपाखरे, एक हजार प्रकारच्या वनस्पती आहेत. याशिवाय अजनी हमेशा, राजडोह तलाव याठिकाणी बारमाही पाणी असल्याने वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होते.

विशेषत: वाघांसाठी हा अभयारण्य प्रसिद्धीच्या झोतात आलेला असून दररोज पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत असते. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही पर्यटक कोका अभयारण्याच्या भ्रमंतीवर आले होते. जंगलातील सैर झाल्यानंतर पर्यटकांना अभयारण्य कसा वाटला, काही सूचना असल्यास त्या नमूद करण्यासाठी फिडबॅक फॉर्म भरून मागितला जातो.

त्यातच भंडारा जिल्ह्यातील दीपक साखरकर या पर्यटकाने फिडबॅक फॉर्ममध्ये असलेल्या निसर्ग मार्गदर्शकाचे वन्यजीव, जंगलाचे ज्ञान, जागरुकता आणि एकंदर स्वभाव, वागणूक कशी वाटली याबाबत अभिप्राय सकारात्मक नमूद केले.

त्यानंतर त्याने अभयारण्यात आलेले अनुभव आणि अमुल्य सूचनेच्या रकान्यात ' मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे तिनदा लिहून अभयारण्य आणि वन्यप्राण्यांबद्दलचे प्रेम व्यक्त केले.

या अभिप्रायावरून त्यांना हा अभयारण्य चांगलाच आवडला. ते पुन्हा अभयारण्याला भेट देतील, यात शंका नाही. मात्र, या विधानावरून राज्याला पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading