Home /News /maharashtra /

MHADA exam: म्हाडा भरतीची परीक्षा Online घेऊनही घोटाळा, डमी उमेदवाराचा पर्दाफाश, बीडमध्ये मुन्नाभाईला बेड्या

MHADA exam: म्हाडा भरतीची परीक्षा Online घेऊनही घोटाळा, डमी उमेदवाराचा पर्दाफाश, बीडमध्ये मुन्नाभाईला बेड्या

म्हाडा भरतीची परीक्षा Online घेऊनही घोटाळा, डमी उमेदवाराचा पर्दाफाश, बीडमध्ये मुन्नाभाईला बेड्या

म्हाडा भरतीची परीक्षा Online घेऊनही घोटाळा, डमी उमेदवाराचा पर्दाफाश, बीडमध्ये मुन्नाभाईला बेड्या

परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर म्हाडाची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता या भरती परीक्षेला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने भरती परीक्षा घेतली जात असताना आता एका डमी उमेदवाराला बीडमध्ये पकडण्यात आले आहे.

बीड, 1 फेब्रुवारी : म्हाडा भरती परीक्षा (MHADA recruitment) ऑफलाईन पद्धतीने होणार होती. मात्र, या भरती परीक्षेच्या एक दिवसआधीच घोटाळा होत असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा ऑनलाईन (MHADA exam online) पद्धतीने होत आहे मात्र, असे असले तरी परीक्षेत गैरव्यवहार सुरूच असल्याचं दिसत आहे. आज सुरू असलेल्या म्हाडा भरतीच्या परीक्षेत मुन्नाभाईला पकडण्यात आले आहे. (Dummy candidate arrested in MHADA recruitment exam center in Beed) म्हाडा गृहनिर्माणच्या परीक्षेत डुप्लिकेट उमेदवाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बीडमधील परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पकडण्यात आलेला डुप्लिकेट विद्यार्थ्याकडे मायक्रोफोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे एक मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बीड शहरातील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणच्या विविध पदासाठी आज परीक्षा सुरू झाली. बीडच्या बस स्थानकाच्या पाठीमागे दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन येथे उमेदवारांना हॉल तिकीट तपासणीच्या वेळी परीक्षार्थींच्या नावाखाली दुसराच तरुण आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. प्रवेशपत्र तपासत असताना चौकशी केल्यावर सदरील तरुणाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. वाचा : सुसाईड नोट लिहून तरुण व्यावसायिकानं संपवलं जीवन; चौथ्या मजल्यावरून मारली उडी त्या ठिकाणी असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने या तरुणाच पाठलाग करून पकडले. याबाबत शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राहुल सानप नावाच्या मुलाच्या जागी दुसराच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज राज्यातील विविध केंद्रांवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागाची परीक्षा होत आहे. यात बीडमध्ये एक डमी विद्यार्थी आढळल्याची घटना घडली आहे. अर्जुन बिघोट असे या तरुणाचे नाव असून, त्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. वडझरी येथील राहुल किसन सानप या परीक्षार्थीच्या नावावर अर्जुन हा परीक्षा देत होता अशी माहिती पुढे आली आहे. अर्जुन बिघोट असे या तरुणाचे नाव असून, त्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. वडझरी येथील राहुल किसन सानप या परीक्षार्थीच्या नावावर अर्जुन हा परीक्षा देत होता अशी  माहिती पुढे आली आहे. वाचा : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात IAS अधिकाऱ्याला अटक बीड येथील आदर्शनगर भागातील दिशा संगणक केंद्रावर अर्जुन हा परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाइल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना आरोपीला जालना रोड परिसरात एका बँकेच्या समोर पोलीस कर्मचारी संगिता शिरसाट, संजय राठोड, मोहसीन शेख आणि जेल पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडले. यातून मोठे रॅकेट समोर येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Exam, Mhada 2022, Online exams, Online fraud, Police arrest, Scam, Scam in maharashtra

पुढील बातम्या