मुंबई, 08 डिसेंबर : उपनगराममध्ये 2 हजार 46 घरांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांमध्ये यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि वेंगुर्ल्यात घरांसाठी ही सोडत असणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 1, अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 23 तर मध्यम उत्पन्न गटासाठी 18 आणि उच्च उत्पन्न गटासाठी चार घरे यामध्ये असणार आहेत.
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीच्या निकषातील बदल आणि नव्या संगणकीय प्रणालीमुळे ही सोडत पुढे ढकलली होती. आता नवी प्रणाली तयार झालीय. सध्या त्याच्या चाचण्यासुद्धा यशस्वी झाल्या आहेत. त्यानंतरच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांची अंतिम आकडेवारी निश्चित केलीय.
हेही वाचा : सीमावादात सर्वसामान्यांची पायपीट, रेणुकादेवी भक्तांचे मोठे हाल, Video
म्हाडाच्या सोडतीत आरक्षित घरांसाठी पत्रकार, कलाकार, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांसह इतर गटांना अर्ज करता येतो. त्यासाठी नव्या बदलानुसार आता आवश्यक ती प्रमाणपत्रे सोडतीआधीच द्यावी लागणार आहेत. या प्रमाणपत्रांची छाननी सोडतीआधी होईल. ऑनलाइन छाननीपूर्वी प्रमाणपत्राचा नमुना प्रसिद्ध केला जाईल. त्यानुसारच प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mhada lottery, Mumbai, Thane