सावधान! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा

सावधान! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, कोकण किनारपट्टी, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि गोव्यात पावसानं जोर धरला आहे.

  • Share this:

मुंबई, 03 सप्टेंबर: रात्रीपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून दमदार हजेरी लावली. पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस असल्यानं मच्छीमारांना आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

मंगळवारी दीड दिवसाच्या घरगुती गणपती बप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. पहाटेपासून पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान पाऊसाचा जोर कमी व्हावा यासाठी भाविक गणरायाकडे प्रार्थना करत आहेत.

मुंबई, कोकण, विदर्भ, छत्तीसगड, गोवा या भागांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता.

हरितालिका विसर्जन जीवावर बेतले, दोन मुलं आणि दोन महिला नदीत गेले वाहून

गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मुसळदार पावसाने दमदार हजेरी लावली. दोन तास सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव भागात पाणी साचलं. या तालुक्यात असलेल्या केशोरी गावाजवळील धोबी नाल्यावरच्या पुलावरून २ ते ३ फूट पाणी असल्यानं नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे पुलावरील वाहतूकही बंद झाली असून चार गावांचा संपर्क तुटलेला आहे.

बाप्पांच्या आगमनासोबत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात गणेशपूर, वाकद, भरजहांगीर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गणपती प्रतिष्ठापणेच्या दिवशी वरुण राजा बरसल्याने दुष्काळग्रस्त रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गणेश भक्तांसाह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी बळीराजानं गणेशोत्सवात सलग 10 दिवस दमदार पाऊस पडून दुष्काळ दूर होऊदे असं गणरायाकडे साकडंही घातलं आहे.

काही भागांमध्ये आजही पावसानं दडी मारली असल्यानं बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात मुसळधार पाऊस पडून दे आणि दुष्काळ दूर होऊदे असं गणरायाला राजकारणी नेत्यांपासून भाविकांपर्यंत सर्वांनी साकडं घातलं आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खासदाराचं असं रुप कधी पाहिलंय? हे लोकप्रतिनिधी झाले भजनीबुवा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 07:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading