मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'इगो सोडा आणि आरेमध्ये काम करा', फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

'इगो सोडा आणि आरेमध्ये काम करा', फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

'राज्य सरकारने एमएमआरडीला दिलेला कांजूरमार्गची जागा हा निर्णय चुकीचा आहे. ही जागा पहिल्यापासून वादात होती'

'राज्य सरकारने एमएमआरडीला दिलेला कांजूरमार्गची जागा हा निर्णय चुकीचा आहे. ही जागा पहिल्यापासून वादात होती'

'राज्य सरकारने एमएमआरडीला दिलेला कांजूरमार्गची जागा हा निर्णय चुकीचा आहे. ही जागा पहिल्यापासून वादात होती'

    मुंबई, 16 डिसेंबर :  मुंबई हायकोर्टाने (Mumbai high Court) कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे (metro car shed kanjurmarg)आदेश दिले असून ही ठाकरे सरकारला चपराक आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच सरकारने आता इगो सोडून आरेमध्ये काम करावे असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्गमध्ये सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामाला जैसे थे ठेवण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रसिद्ध सराफा व्यावसायिकानं छातीत झाडली गोळी, पुण्यातील धक्कादायक घटना 'राज्य सरकारने एमएमआरडीला दिलेला कांजूरमार्गची जागा हा निर्णय चुकीचा आहे. ही जागा पहिल्यापासून वादात होती. जर कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड करायचा असेल तर चार वर्ष आणखी विलंब होणार आहे. तसंच 4 हजार कोटींचा भुर्दंड सुद्धा राज्य सरकारला बसणार आहे. तरी सुद्धा राज्य सरकार हट्ट का करत आहे, हे कळायला मार्ग नाही' असा टोला फडणवीसांनी लगावला. 'मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने आधीच या आरेतील जागेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तरी इगो सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. अधिवेशनात सुद्धा मी हीच भूमिका मांडली होती. पण मुख्यमंत्र्यांनी मिठाचा खडा का टाकता असं म्हणाले होते, पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला. तुमची कहाणी सांगा आणि मिळवा बक्षीस, पुणेकर विद्यार्थ्याचा अनोखा उपक्रम दरम्यान, 'आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हे खरं आहे. मेट्रो लाईन 3 प्रमाणेच मेट्रो लाईन 6, 4 आणि 14 साठी ही जागा अत्यंत मोक्याची आहे. यामुळे राज्य सरकारचे जवळपास साडे पाच हजार कोटी वाचणार आहे आणि एक कोटी लोकांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या