मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

यंदा ज्या राज्यांमध्ये कडक उन्हाळा, तिथे बरसणार चांगला पाऊस? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

यंदा ज्या राज्यांमध्ये कडक उन्हाळा, तिथे बरसणार चांगला पाऊस? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

यंदा बऱ्याच राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पडला. त्यामुळे मार्च महिन्यात या राज्यांमध्ये खूप तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे

यंदा बऱ्याच राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पडला. त्यामुळे मार्च महिन्यात या राज्यांमध्ये खूप तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे

यंदा बऱ्याच राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पडला. त्यामुळे मार्च महिन्यात या राज्यांमध्ये खूप तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे

नवी दिल्ली 18 एप्रिल : दरवर्षीप्रमाणे यंदाही काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. परंतु, हा अवकाळी पाऊस ज्याला मॉन्सूनपूर्व पाऊसही (Pre-Monsoon Rain) म्हणतात, तो यंदा नेहमीपेक्षा कमी प्रमाणात पडलाय. त्यामुळे यंदा ज्या राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस (Rain) कमी पडला, त्या राज्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस जास्त पडेल, असं हवामान खात्याने म्हटलंय. देशातील ज्या भागांत मॉन्सूनपूर्व पावसाच्या हालचाली सामान्यपेक्षा कमी आहेत, त्या भागात मॉन्सूनचा पाऊस जास्त पडेल. परिणामी, त्या भागातील दुष्काळाचा (Drought) धोका कमी होईल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदाचा मॉन्सूनपूर्व कालावधीचा निम्मा कालावधी उलटून गेला आहे. यादरम्यान देशात 43 टक्के कमी पाऊस झाला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात 91% आणि मध्य भारतात 81% कमी पाऊस झाला आहे. यंदा बऱ्याच राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पडला. त्यामुळे मार्च महिन्यात या राज्यांमध्ये खूप तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. यंदा मार्च महिन्यातच या राज्यांनी तापमानाचे अनेक रेकॉर्ड तोडले, शिवाय नागरिकांना मोठ्या प्रमाणात उकाडा सहन करावा लागला. Weather Forecast : आज 25 शहरांमधील तापमान राहणार 40 अंशापेक्षा जास्त; कशी असेल तुमच्या शहरातील स्थिती? दरम्यान, हवामान खातं आणि खासगी हवामान संस्था स्कायमेटचं म्हणणं आहे की, गुजरात वगळता या राज्यांमध्ये या यंदा मॉन्सूनचा (Monsoon) पाऊस सामान्य किंवा चांगला असू शकतो. तसंच ज्या भागांत मॉन्सूनपूर्व पावसाचं वातावरण कमी असतं तिथे चांगला पाऊस पडतो, याचा कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण, यावेळी ते होणार असून हा निव्वळ योगायोग असेल. तज्ज्ञ काय म्हणतात? हवामान तज्ज्ञांच्या मते, मॉन्सूनपूर्व हंगामाच्या उर्वरित दीड महिन्यात कमाल तापमानात अनेक तीव्र चढ-उतार पाहायला मिळतील. येत्या 45 दिवसांत आठवड्यातून किमान एकदा किंवा 10 दिवसांच्या अंतराने तापमान वाढीला ब्रेक लागेल आणि पाऊस पडेल. मे महिन्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात सागरी वादळही येऊ शकतं. त्यामुळे देशभरात उष्णतेपासून कमी-अधिक प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा पाऊस आणि त्यापूर्वीचे तीन महिने म्हणजे मार्च ते मे या कालावधीत पडणाऱ्या पावसाला मॉन्सूनपूर्व पाऊस म्हणतात. अपघातानंतर सायकल रायडरच्या एका निर्णयाने पलटली बाजी! पराक्रमानंतर Super Mom चं होतंय कौतुक मॉन्सूनच्या पावसाचा दशकातील ट्रेंड पाहिल्यास 1921 ते 1970 या पाच दशकांत मॉन्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा जास्त होता. त्यानंतरची 50 वर्षे, म्हणजे 1971 ते 2020 या काळात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. आता हा ट्रेंड पुन्हा बदलतोय. कारण, गेल्या तीन पावसाळ्यांत पाऊस सामान्य होता, तो येत्या काही दशकांत वाढू लागेल, असं हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. प्रत्येक दशकात कमी-अधिक बरसलेला पाऊस 1901-1910 -6.4% 1911-1920 -2.4% 1921-1930 +2.7% 1931-1940 +4.9% 1941-1950 +5.5% 1951-1960 +3.3% 1961-1970 +0.7% 1971-1980 -2.1% 1981-1990 -1.0% 1991-2000 -0.6% 2001-2010 -4.6% 2011-2020 -3.8% हा डेटा मागील तब्बल 120 वर्षांचा आहे. त्यावरून कोणत्या दशकात पाऊस किती टक्क्यांनी कमी झाला आणि किती टक्क्यांनी वाढला, याची माहिती देण्यात आली आहे. याच ट्रेंडचा अभ्यास करून या दशकात पाऊस चांगला पडेल, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
First published:

Tags: Monsoon, Rain fall, Weather forecast

पुढील बातम्या