Sunday Weather: हवामान विभागानं सांगितला राज्यातील स्थितीचा अंदाज

Sunday Weather: हवामान विभागानं सांगितला राज्यातील स्थितीचा अंदाज

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. अशात रविवारी राज्यात काय वातावरण राहिल याबद्दलचा अंदाज हवामान शास्त्र विभागानं प्रसिद्ध केला आहे.

  • Share this:

मुंबई 20 फेब्रुवारी : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. याचा मोठा फटका पिकांना बसला आहे. याशिवाय गारपीटीमुळे (Hailstorm) राज्यातील गारठाही पुन्हा वाढला आहे. मात्र, या सगळ्यापासून आता दिलासा मिळणार असल्याचं समोर येत आहे.

रविवारपासून राज्यावरील पावसाचं सावट दूर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाचे पट्टे क्षीण होत असल्यानं पावसाचं सावट दूर होण्यास मदत होणार आहे. तर, आज म्हणजेच शनिवारी हवामान शास्त्र विभागानं मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाचा नाशिक, नागपूर आणि सांगली या जिल्ह्यांना अधिक फटका बसला आहे. याठिकाणी द्राक्ष बागा आणि इतर पिकंही जमिनदोस्त झाल्याचं वृत्त आहे.

समुद्रातून येणारं बाष्प आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळं राज्यात मागील तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, आता २१ फेब्रुवारीपासून राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती राहील, असं हवामान शास्त्र विभागानं म्हटलं आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रूपानं बळीराजावर पुन्हा अस्मानी संकटानं घाला घालून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिकच्या ग्रामीण भागात कोणत्या पिकांचे किती नुकसान झालं याचा अंदाज पाहूया .

मालेगाव तालुका-755 हेक्टर, सटाणा तालुका- 2733 हेक्टर, चांदवड-355 हेक्टर, येवला-121 हेक्टर, निफाड तालुका- 992 हेक्टर, कळवण तालुका- 45 हेक्टर, दिंडोरी तालुका- 793 हेक्टर, नाशिक तालुका-70 हेक्टर, त्र्यंबकेश्वर तालुका-72 हेक्टर, सिन्नर तालुका-151 हेक्टर

Published by: Kiran Pharate
First published: February 20, 2021, 2:37 PM IST

ताज्या बातम्या