मुंबई, 27 एप्रिल: महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट असताना आणखी एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
राज्यात बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्यात 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वारासह पावसाचा अंदाज भागात वेधशाळेनं वर्तवंला आहे. वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे आंबा आणि द्राक्ष फळाचे मोठं नुकसान होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा..मुंबईत लपलेल्या 11 तबलिगींच्या मुसक्या आवळल्या, धक्कादायक माहिती आली समोर
मराठवाडा आणि विदर्भात काही भागात तुरळक तर काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा शक्यता आहे. कोकणाचा काही भाग आणि गोव्यात तूरळक पावसाचा अंदाज आहे.
पुण्यात तीन दिवसाचे...
पुण्यातही तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. 28, 29 आणि 30 तारखेला मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा.. 48 तासांत कोरोनामुळे 3 सहकारी गमावल्याचं ऐकून पोलिस अधिकाऱ्याला रडू कोसळलं
1 मे रोजी चक्रीवादळ उठणार...
राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असताना स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. एक मेरोजी चक्रीवादळ उठणार असल्याचा अंदाज आहे. सध्या हे वादळ तयार झालं असून बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या समुद्रात आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे ढग गोळा होणार आहे.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.