संतापजनक.. लग्नात आलेल्या गतिमंद मुलीवर 55 वर्षीय नराधमाने केला बलात्कार

संतापजनक.. लग्नात आलेल्या गतिमंद मुलीवर 55 वर्षीय नराधमाने केला बलात्कार

एका 55 वर्षीय नराधमाने गतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास महागावमधील करंजखेड येथे घडली. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

  • Share this:

यवतमाळ, 21 मे- एका 55 वर्षीय नराधमाने गतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास महागावमधील करंजखेड येथे घडली. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

गेवराई तालुक्यात तिहेरी अपघात.. गरोदर महिलेचा कारमध्ये जळून झाला कोळसा

करंजखेड येथील एका विवाह सोहळ्यात पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. तिची मानसिक अवस्था हेरुन करंजखेड येथील 55 वर्षीय नराधम तिच्यावर पाळत ठेऊन होता. आरोपी मूळचा करंजखेड येथील रहिवासी असून त्याच्या पत्नीचे निधन झाल्याने तो बाहेरगावी राहतो. दोन दिवसांपूर्वीच तो गावात आला होता. मध्यरात्र आरोपीने पीडितेला झोपेतून उठवून जबरदस्तीने त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलगी दिसत नसल्यामुळे आई-वडील व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता मुलीच्या अंगावरील कपडे आरोपीच्या अंगणात पडलेले दिसले. घराचे दार उघडून पाहिले असता आरोपी मुलीवर बलात्कार करत असलेल्याचे आढळून आले.

पुण्यात इस्टेट एजंटची निर्घृण हत्या.. डोक्‍यात व खांद्यावर कोयत्याने केले वार

गावकऱ्यांनी नराधमाला चोप देऊन घरात बांधून ठेवले. नंतर महागाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .पीडित मुलगी गतिमंद असल्याने तिला बोलता येत नाही. तसेच ती झालेल्या अत्याचाराबाबत जबाबही देऊ शकत नाही. त्यामुळे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पोलिसांनाही प्रश्न पडला आहे. त्या पीडितेची वैद्यकिय तपासणीसाठी पुसद आणि नंतर यवतमाळ शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

VIDEO: लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले

First published: May 21, 2019, 2:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading