बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांचं अनोखं आंदोलन, रामकुंडावर केलं पिंडदान!

बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांचं अनोखं आंदोलन, रामकुंडावर केलं पिंडदान!

नाशिकच्या रामकुंडावर हे अनोखं आंदोलन पार पडलं. राज्यातील अनेक पुरुष या रामकुंडावर जमले होते. ते चक्क मुंडन आणि पिंडदान करण्यासाठी.

  • Share this:

नाशिक, 22 सप्टेंबर : तुम्ही अनेक प्रकारची आंदोलनं पाहिलं असतील आणि आंदोलनाची विविध कारणंही तुम्ही पाहिली असतील. पण राज्यातील तमाम पुरुषांनी एक आगळ-वेगळं आणि धक्कादायक आंदोलन केलं आहे. राज्यातील पत्नी पीडित पुरुषांनी मुंडन आणि पिंडदान करत आंदोलन केलं आहे. सर्व कायदे महिलांसाठी आहेत त्यामुळे पुरुष झाले वंचीत असा आरोप या आंदोलनातून करण्यात आला आहे.

नाशिकच्या रामकुंडावर हे अनोखं आंदोलन पार पडलं. राज्यातील अनेक पुरुष या रामकुंडावर जमले होते. ते चक्क मुंडन आणि पिंडदान करण्यासाठी. पत्नीपीडीत आणि महिला संरक्षण कायदा पीडित पुरुषांनी हे आंदोलन केलं आहे. सध्या संपूर्ण जगभर या आंदोलनाची चर्चा सुरू आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! पहिल्यांदा छेड काढली नंतर वारंवार दिराने केला वहिनीवर बलात्कार

देशात प्रचलीत असलेल्या सर्व कायद्यांचं फक्त महिलांना संरक्षण असल्याचा आरोप या पुरुषांनी केला आहे. पुरुषांसाठी एकही कायदा नसल्याचंही या पुरुषांचं म्हणणं आहे. यातील अनेकांवर त्यांच्या पत्नीनं खोटे खटले दाखल केल्याचा दावा केला आहे. कायद्याचा धाक दाखवून महिला पुरुषांवर प्रचंड अत्याचार करत आहेत असा आरोप करून या पुरुषांनी चक्क मुंडन आणि पिंडदान केलं.

इतर बातम्या - पिंपरी चिंचवडकरांनो, हे आहेत तुमचे नवीन पोलीस आयुक्त!

खरंतर आपण तिहेरी तलाक सारखा कायदा पाहिला यामध्ये तोंडी तलाख देण्याची पद्धत होती. या कायद्यामुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात आला. तसं पाहिला गेल तर देशात महिला सुरक्षित नाही आहेत. पण कायद्याचा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर करणाऱ्या महिलाही कमी नाही आहेत. त्यामुळे पुरुषांनी असं अनोखं आंदोलन केलं असावं.

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 04:00 PM IST

ताज्या बातम्या