Home /News /maharashtra /

लवकरच मिळेल सकारात्मक बातमी.. 'मेगाभरती'बाबत रोहित पवारांनी दिले संकेत

लवकरच मिळेल सकारात्मक बातमी.. 'मेगाभरती'बाबत रोहित पवारांनी दिले संकेत

बेरोजगार तरुणांनी/मजूरांनी तुम्हाला सत्तेवर बसवले त्यांच्या 72000 जागांच्या मेगा भरती विषयी विद्यार्थी तुम्हाला सारखं प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही गप्प का?

  मुंबई, 21 ऑक्टोबर: 'दादा, तुम्ही प्रत्येक पक्षाच्या आमदार-खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. रिप्लाय देतात पण ज्या बेरोजगार तरुणांनी/मजूरांनी तुम्हाला सत्तेवर बसवले त्यांच्या 72000 जागांच्या मेगा भरती विषयी विद्यार्थी तुम्हाला सारखं प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही गप्प का? असा सवाल एका बेरोजगार तरुणानं राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांना केला होता. 'लवकरच सकारात्मक बातमी मिळेल', असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहे. 'मेगाभरतीचा शब्द आम्ही पाळणार आहोत. आतापर्यंत हे विचारण्याची वेळच तुमच्यावर आली नसती, पण आपण पाहत आहात की सरकार आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकट येतायेत. तरीही सरकारला युवांची काळजी आहे. लवकरच आपल्याला सकारात्मक बातमी मिळेल.', असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. हेही वाचा... महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून राज्यात 72 हजार रिक्त पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. तत्कालीन फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही भरती आचारसंहितेत अडकली. नंतर महाविकास आघाडी सरकारने मार्च 2020 मध्ये सर्वच विभागांमधील रिक्त पदांची माहिती संकलित केली. त्यामुध्ये सरकारी विभागांमधील गट 'अ'च्या 11000, गट 'ब'मधील 21 हजार 92, गट 'क'मधील 86 हजार आणि गट 'ड'मधील 4 हजार 252 तर जिल्हा परिषदांमील 47 हजार जागांचा समावेश होता. त्यानुसार महाविका आघाडी सरकानं एकूण रिक्त पदाच्या 50 टक्के जागा भरतीचं नियोजन केलं होतं. मात्र, तरी या निर्णयावर कार्यवाही झाली नाही. कोरोनामुळे त अद्यापही स्वप्नच राहिले आहे. काही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत कामे करून घेत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारनं घेतला होता. महसूल, कृषी, आरोग्य, PWD, गृह, जलसंधारण, वित्त अशा विविध विभागांमध्ये ही मेगाभरती होणार आहे. मात्र, त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती. ही आहे संपूर्ण यादी... कृषी विभाग कृषी सेवा वर्ग 1,2, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक पशुसंवर्धन सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, पशुधन पर्यवेक्षक, परिचर दुग्धविकास अभियांत्रिकी गट (कनिष्ठ) दुग्धविकास-अभियांत्रिकी गट, दुग्धसंवर्ध, प्रारण, दुग्धशाळा आणि कृषी पर्यवेक्षक, दुग्धसंकलन विकास अधिकारी आणि तंत्रज्ञ मत्सव्यवसाय सहायक आयुक्त, मत्सव्यवसाय विकास अधिकारी, सहा. मत्सव्यवसाय विकास अधिकारी ग्राम विकास विभाग आयुर्वेदिक वैद्य, वैद्यकीय अधिकारी-वर्ग 3, अवैद्यकीय पर्यवेक्षक, युनानी हकीम, कृषी अधिकारी, कनिष्ठ अभियंता विस्तार अधिकारी श्रेणी-2, विस्तार अधिकारी श्रेणी -3, साथरोग वैद्यकीय अधिकारी, सार्व. आरोग्य परिचर, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कृष्ठरोग तंत्रज्ञ,आरोद्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आरोग्य सहा (महिला),विस्तार अधिकारी (कृषी),स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहा.पशुधन विभाग अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक,प्रयोगशाळा सहायक,पर्यवेक्षिका,कनिष्ठ अभियंता,जिल्हा सार्व.परिचारिका,विस्तार अधिकारी (आयु),प्रशिक्षित दाई,विकास सेवा गट-क,गट-ड. सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट क (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट ड (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गृह विभाग पोलीस उप अधीक्षक,वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकरी,सहायक गुप्ता वार्ता अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस शिपाई, सार्वजनिक बांधकाम सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मृद व जलसंधारण विभाग सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वित्त विभाग सहायक संचालक,कनिष्ठ लेखापाल

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Maharashtra, Rohit pawar, Sharad pawar

  पुढील बातम्या