• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • कोरोनाची लाट ओसरताच शिवसेनेत मेगा भरती; कुठल्या पक्षाला लागणार गळती?

कोरोनाची लाट ओसरताच शिवसेनेत मेगा भरती; कुठल्या पक्षाला लागणार गळती?

Mega bharti in Shiv Sena soon: युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेत मोठी भरती होण्याच्या संदर्भात वक्तव्य केलं आहे.

 • Share this:
  नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 22 जुलै: शिवसेनेत इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी भरती (Mega Bharti in Shiv Sena) होणार असल्याचा दावा युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला आहे. कोरोनाची लाट (Covid wave) ओसरताच शिवसेनेत मेगा भरती होताना दिसेल असं वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी वर्धा येथे केलं आहे. कोरोनाची लाट ओसरताना शिवसेनेत मेगा भरती होताना दिसेल. अन्य पक्षातील अनेक चांगले पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छूक आहेत. स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी तसेच संपर्क प्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर येत्या काळात जशी कोरोनाची लाट ओसरताना दिसेल तशी शिवसेनेत मेगा भरती होताना दिसेल. प्रत्येक राजकीय पक्षातील चांगल्या कार्यकर्त्याना शिवसेनेत यायचे आहे असे वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी केले आहे. अनिल देशमुख यांना मोठा झटका; CBI ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास अनेक पक्षातील नेते, कार्यकर्ते उत्साही आहेत. चांगले कार्यकर्ते, चांगल्या नेत्यांना प्रवेश देऊन संधी देण्यात येईल, त्याबद्दलचे निर्णय शिवसेनचे नेते घेतील. आदित्य शिरोडकर शिवसेनेत आले आहेत. त्यांच्यासोबतच चांगले पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत सामील होतील. युवा सेनेचे पदाधिकरी असले तरी निष्ठावान कार्यकर्ते असतात. चांगले काम करत असेल तर कार्यकर्त्यांची दखल घेत योग्य उमेदवारी देतील असंही वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छूक असल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कुठल्या पक्षाला गळती लागणार आणि कुठल्या पक्षातील नेते, पदाधिकारी शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छूक आहेत याबाबत चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: