भाजपचं पुढचं लक्ष्य ठरलं; चिंतन बैठकीतली Inside Story

भाजपचं पुढचं लक्ष्य ठरलं; चिंतन बैठकीतली Inside Story

भाजपच्या तीन दिवसांच्या चिंतन बैठकीचा समारोप झाला तेव्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असा दावा पुन्हा एकदा करण्यात आला. तो कसा हे अद्याप स्पष्ट नाही. पण या बैठकीत पक्षविस्ताराची आणि राज्यातल्या राजकारणाची पुढची दिशा ठरली आणि पुढचं लक्ष्य ठरवण्यात आलं.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असं पुन्हा एकदा सांगत चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना दिलासा दिला. पण भाजप संख्याबळ कसं सिद्ध करणार याबाबत मात्र त्यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही. दादरमध्ये भाजपच्या नेत्यांची बैठक गेले तीन दिवस सुरू होती. भाजपच्या पराभूत उमेदवारांशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या दोघांनीही चर्चा केली. पराभवाच्या कारणांचा विचार आणि पक्षवाढीच्या दृष्टीने पुढचा आराखडा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं. या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडींची चर्चा झालीच. त्याचबरोबर आगामी स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीनेही भाजपची रणनीती ठरवण्यात आली, असं दिसतं. भाजपचं उद्दीष्ट आता स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांच्या निवडणुका हे असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

या बैठकीच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "59 जागी आम्ही विजयी झालो नाही मात्र त्यातल्या 55 जागी आम्ही क्रमांक दोनवर होतो. 59 जागी पराभूत झालेल्या उमेदवारांशी चर्चा झाली आणि पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांना सकारात्मक दृष्ट्या सामोरे जातील."

एकीकडे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना युतीचे ताणलेले संबंध जुळण्याची शक्यता नाहीच. दुसरीकडे शिवसेनेनं काँग्रेस - राष्ट्रवादीशी जमवलेलं सूत मात्र किमान समान कार्यक्रमापर्यंत पोहोचलं आहे.

वाचा - शिवसेना NDAतून बाहेर पडणार? संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा

या सगळ्यावर चर्चाही भाजपच्या चैतन बैठकीत झाली.  गेले तीन दिवस बैठका सुरू होत्या. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह भाजपनेसुद्धा आमचंच सरकार येईल असा दावा भाजपकडून अजूनही वारंवार केला जात आहे. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमच्याकडे 119 संख्याबळ असल्याचं सांगत आहेत.

वाचा - मुख्यमंत्री करायचं तरी कोणाला? शिवसेनेसमोर यक्ष प्रश्न

त्या संख्याबळाच्या जोरावर आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ असा दावा ते करत आहेत. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपचे 15 ते 20 आमदार संपर्कात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन कशी करणार हे अद्याप स्पष्ट नाही.

नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची

येत्या 22 नोव्हेंबरला होणारी नाशिक महापौरपदाची निवडणूक सत्ताधारी भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. स्पष्ट बहुमत असलं तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणी मनसेनं एकत्रित येऊन भाजपला शह देण्याचं ठरवलं आहे.

वाचा - राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार, शरद पवार आणि सोनिया यांच्यात उद्या बैठक

नगरसेवक फुटीचा धोका स्वीकारायला तयार नसल्यानं, भाजप आपल्या नगरसेवकांना सहलीला पाठवतोय. नाशिकला हे सर्व नगरसेवक एका हॉटेलला एकत्र झाले असून ते थोड्याच वेळात अज्ञात स्थळी रवाना होणार आहे.

महाराष्ट्राचा निर्णय दिल्लीतच

दरम्यान, सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या चर्चा करतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनेची विचारधारा वेगळी असली तरी प्रगतीच्या मुद्यांवर आम्ही एकत्र येऊ. सध्यातरी काही सांगता येत नसलं तरी एकमत झाल्यावर निर्णय जाहीर केला जाईल असं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

-------------------------------------

अन्य बातम्या

राज्यात नवीन समीकरण? भाजपसमोर शरद पवार हाच एकमेव पर्याय

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकत्र घेणार राज्यपालांची भेट

'यारों... ने ये एहसान किया है' संजय राऊत यांचे ट्विट

First published: November 16, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading