Home /News /maharashtra /

BREAKING : शेतकरी संपाची पुन्हा पेटली मशाल, ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार?

BREAKING : शेतकरी संपाची पुन्हा पेटली मशाल, ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार?

शेतकरी पुन्हा एकदा संपावर.. ? ठाकरे सरकराची डोकेदुखी वाढण्याची शक्यता.. संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांबा गावात बैठक

  सुनिल दवंगे,प्रतिनिधी

  अहमदनगर 17 मे : शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी (farmers) हवालदिल झाले आहेत. राज्यात लाखो टन ऊस गाळप विना शिल्लक आहे. (sugarcane farmers) कांदा कवडीमोल झाला आहे, त्यामुळे फळपिके फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी ऐतिहासिक शेतकरी संपाची मशाल पेटवणाऱ्या राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात शेतकरी आंदोलनाबाबत नुकतीच एक बैठक पार पडली आहे.शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

  पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर किसान क्रांतीचे पदाधिकारी, शेतकरी नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी यांची बैठक पार पडली. यावेळी आंदोलनाचा निर्धार करण्यात आला. लवकरच ग्रामसभा घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच कमिटी निवडीसाठी 23 मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  शेतकरी पुन्हा एकदा संपावर जाणार का? की राज्यव्यापी आंदोलन करणार याबाबत ग्रामसभेत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेतेही एकत्र येत आहेत.

  हे ही वाचा : Weather update : राज्यातील 12 जिल्ह्याना IMD कडून alert, पुणे, कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

  शेतकऱ्यांच्या बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली. 1) उसाला दोन लाख अनुदान 2) कारखान्यांनी परिसरातील ऊस शिल्लक राहू देऊ नये,जो ऊस राहील त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने त्याच्या साठी काढलेले कर्ज, खर्च, शासनाने करावा. 3) पूर्ण दाबाने दिवसा वीज पुरवठा शासनाने करावा. 4) कांद्याला 2000 रुपये नाफेडने हमी भाव. 5)  शेतकर्‍यांना मुबलक खते, 6) कर्ज माफीची अमलबजावणी झाली पाहिजे. 7) घटनेतील परिशिष्ट नऊ रद्द. 8) शेतकर्‍यांना शेतीमालाचे भाव व वेतन आयोगाचा ताळमेळ बसविणे. 9) शिल्लक ऊस बाबत साखर संघाने नियोजन करणे.

  हे ही वाचा : शाळेच्या कॅफेटेरियामध्ये मुस्लिम मुलांना खाऊ घातलं Pork,संतापलेल्या पालकांची शाळेबाहेरचं निदर्शनं

  10) शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी अनुदान द्यावे 11) ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपी लागू करावी 12) विहिरींसाठी पाच एकराची अट रद्द करावी 13) गव्हाची बंद केलेली निर्यात सुरू करावी

  राज्यातील शेतकऱ्यांनी सन 2017 मध्ये ऐतिहासिक संप पुकारला होता. 16 दिवस चालले्या या संपाची संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती. यासाठी पुणतांब्यात हे केंद्रस्थानी होते. आता पुन्हा एकदा याच पुणतांब्यामध्ये विविध संघटनांची शेतकरी एकवटल्याने राज्य सरकारची डोके दुखी वाढू शकते.  त्याच बरोबर 23 मे रोजी बैठकीच आणखी काय खलबते होतात याकडे लक्ष लागले आहे.

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Farmer protest, कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी, शेतकरीसंपावर

  पुढील बातम्या