बापरे! केवळ चहा, नाश्त्याचं बिल 1.50 लाख रूपये; महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीतील प्रकार

बापरे! केवळ चहा, नाश्त्याचं बिल 1.50 लाख रूपये;  महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीतील प्रकार

99 कप चहा आणि 25 कप कॉफी मागवण्यात आली होती. पण, चहा नाश्त्याचं बिल तब्बल 1.50 लाख रूपये झालं.

  • Share this:

नागपूर, 28 जून : चहा, नाश्ताचं बिल फक्त 1.50 लाख रूपये ! वाचून धक्का बसला ना? शिवाय, फक्त 1.50 लाख असं म्हटल्यामुळे तुम्हाला राग देखील आला असेल. पण, हे सत्य आहे. दोन दिवसामध्ये चहा, नाश्त्याचं बिल हे 1.50 लाख रूपये झालं आहे. नागपूर युनिव्हर्सिटीतील बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीमध्ये 3 लोक सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च मागितला गेला. तेव्हा तब्बल 1.50 लाख रूपयांचं बिल पाठवलं गेलं. या तिन लोकांनी 2 दिवसामध्ये 99 कप चहा आणि 25 कप कॉफी मागवण्यात आली होती. या चहा, कॉफीचं बिल हे तब्बल 1.50 लाख रूपये झालं आहे. पण, बिलाला मंजूर देण्यास कुलगुरूंनी मात्र नकार दिला आहे. शिवाय, चौकशीचे देखील आदेश दिले आहेत.

या राज्यांमध्ये 2 जुलैपर्यंत पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

चौकशीचे आदेश

दरम्यान, या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश हे कुलगुरूंनी दिले आहेत. कारण, बिल मंजूरीसाठी कुलगुरू एस. पी. काणे यांच्याकडे पाठवलं गेलं. तेव्हा बिलाची रक्कम पाहून त्यांना देखील धक्का बसला. शिवाय, बिलाबाबत बोर्डाकडे स्पष्टीकरण देखील मागितलं गेलं आहे.

‘बिल खरं असल्याचं सिद्ध करा’

दरम्यान, 1.50 लाखाच्या बिलाबाबत संबंधित विभागाला बिल खरं असल्याचं सिद्ध करा असे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, 3 लोकांनी 99 कप चहा आणि 25 कप कॉफी मागितली होती का? अशी देखील विचारणा करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ स्टडीजची बैठक ही मे महिन्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अभ्यासक्रमाबाबत चर्चा झाली होती. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांसाठी चहा, नाश्ता मागवण्यात आला होता. त्याचं बिल 1.50 लाख रूपये झालं आहे.

VIDEO: ट्रेनच्या धडकेत 100 शेळ्यांचा मृत्यू, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 28, 2019, 2:53 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading