मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ शिंदे आणि विश्वजीत कदम यांच्यात बंद दाराआड चर्चा, सांगलीत मोठा राजकीय भूकंप होणार?

एकनाथ शिंदे आणि विश्वजीत कदम यांच्यात बंद दाराआड चर्चा, सांगलीत मोठा राजकीय भूकंप होणार?

विश्वजीत कदम आणि एकनाथ शिंदे

विश्वजीत कदम आणि एकनाथ शिंदे

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Published by:  Chetan Patil
सांगली, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री सांगलीत असताना मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सांगलीत राजकीय भूकंप घडणार की काय? अशा चर्चेला उधाण आलं आहे. विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्यातील पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. विश्वजित कदम यांचे वडील पतंगराव कदम हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना एक महत्त्वाचं स्थान होतं. पतंगराव कदम यांचा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दबदबा होता. त्यांचं 2018 मध्ये निधन झालं होतं. पतंगरावांच्या कार्यामुळे काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांचा आणि सांगली जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा विश्वजीत कदम यांना पाठिंबा आहे. पण विश्वजीत कदम यांनी वेगळा मार्ग निवळला म्हणजे शिंदे गटाची साथ धरली तर काँग्रेसचे त्यांचे कार्यकर्तेदेखील शिंदे गटात सामील होतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय. (त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत : उद्धव ठाकरे) महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनपेक्षितच घटना घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाविरोधात बंड पुकारण्याबाबत कधी कुणी कल्पनादेखील केली नव्हती. पण कल्पनेच्या पलीकडील घटना घडल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ धरली आणि राज्याच्या राजकारणात नवं समीकरण तयार झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं याची पुन्हा एकदा प्रचिती आली. विशेष म्हणजे शिवसेनेचा मोठा गट जेव्हा बंडखोरी करुन आसामच्या गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता तेव्हा काँग्रेसचे देखील काही आमदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे काही आमदार गोव्यातही गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण या चर्चा कालांतराने मावळल्या होत्या. पण आज विश्वजीत कदम आणि शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने पुन्हा नव्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या शिष्ठमंडळाने सांगलीतील विविध जिल्ह्यांच्या प्रश्नावरुन निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.
First published:

पुढील बातम्या