मेडिकल स्टुडंट गर्लफ्रेंडला म्हणाला..तुझ्यामुळेच मी नापास झालो; केली ही विचित्र डिमांड

मेडिकल स्टुडंट गर्लफ्रेंडला म्हणाला..तुझ्यामुळेच मी नापास झालो; केली ही विचित्र डिमांड

परीक्षेत नापास झाल्याचे खापर त्याने गर्लफ्रेंडवर फोडले आहे. 'तुझ्यामुळेच मी नापास झालो, आता तुच माझी फी भर, अशी विचित्र डिमांड त्याने चक्क गर्लफ्रेंडकडे केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद,11 मे- पोलिसांनी 21 वर्षीय एका मेडिकल स्टुडंटला अटक केली आहे. आरोपी बीएचएमएसचे (बॅचलर ऑफ होम्योपथिक मेडिसिन अॅण्ड सर्जरी) शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. परीक्षेत नापास झाल्याचे खापर त्याने गर्लफ्रेंडवर फोडले आहे. 'तुझ्यामुळेच मी नापास झालो, आता तुच माझी फी भर, अशी विचित्र डिमांड त्याने चक्क गर्लफ्रेंडकडे केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी स्टुडंटने गेल्या वर्षी औरंगाबादमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले होते. गर्लफ्रेंडही त्याच्यासोबतच शिक्षण घेत होती. तो अभ्यासात हुशार होता. तरी देखील तो फर्स्ट इयरला नापास झाला. त्यामुळे त्याला सेकंड इयरला अॅडमिशन मिळाले नाही. नापास झाल्याने तो प्रचंड नाराज झाला. आपल्या अपयशाचे खापर त्याने गर्लफ्रेंडवर फोडले. त्याने तिला जबाबदार ठरवत नुकसान भरपाई म्हणून गर्लफ्रेंडला कॉलेज फी भरण्याची मागणी केली.

आरोपीने गर्लफ्रेंडकडे फी भरण्यासाठी सारखा तगादा लावला होता. आरोपीने सोशल मीडियावर गर्लफ्रेंडबाबत उलट-सुलट पोस्ट टाकल्या. अखेर या सगळ्या प्रकाराला कंटाळून तिने त्याच्या विरोधात तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

डॉक्टर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पण पोलीस बसले बघत; अंगावर शहारे आणणारा VIDEO

First published: May 11, 2019, 9:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading