पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान, हतबल झालेल्या बळीराजाचा आक्रोश

पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान, हतबल झालेल्या बळीराजाचा आक्रोश

परतीच्या पावसाचं थैमान, द्राक्ष बागायतींचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल.

  • Share this:

बब्बू शेख (प्रतिनिधी)मनमाड, 28 ऑक्टोबर: परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतींचं मोठं नुकसान झालं आहे. तयार होणारी द्राक्ष बाग अक्षरश: उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. सध्या निसर्गच शेतकऱ्यांच्या मुळावर उठून पिकाचं नुकसान करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने बागलाण,चांदवड यासह इतर भागातील द्राक्षे बागायतदारांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. द्राक्षे बागांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं असा हिसकावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावाना आहे. शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना आपली व्यथा सांगितली आणि प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सुशिक्षित तरुण शेतकरी अभिजीत धोंडगे यांने बँकेचं कर्ज घेऊन 8 एकरावर द्राक्षे बाग लावली होती. मात्र परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. जेंव्हा खासदार डॉ.सुभाष भामरे व बागलाणचे नवनिर्वाचित आमदार दिलीप बोरसे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले यावेळी भावनाविवश झालेल्या या शेतकऱ्याची व्यथा ऐकून लोकप्रतिनिधीना देखील अश्रू अनावर झाले. अभिजीत धोंडगे सारखीच परिस्थिती बागलाण,चांदवडसह इतर भागातील शेतकऱ्यांची आहे त्यांचे ही मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नुकसान भरपाई किंवा मदत मिळावी याकडेच आता शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 01:21 PM IST

ताज्या बातम्या