जिवंत आहेत एमडीएच मसाल्याचे सर्वेसर्वा धरमपाल गुलाटी, पाहा हा VIDEO

जिवंत आहेत एमडीएच मसाल्याचे सर्वेसर्वा धरमपाल गुलाटी, पाहा हा VIDEO

एमडीएच मसाल्याचे सर्वेसर्वा धरमपाल गुलाटी याचं निधन झाल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियावर पाहिल्या असतील पण ही अफवा असल्याचं उघडं झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : एमडीएच मसाल्याचे सर्वेसर्वा धरमपाल गुलाटी यांचं निधन झाल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियावर पाहिल्या असतील, अनेक मराठी न्यूज  वेबसाईट्सनीही या बातम्या दिल्या. पण ही अफवा असल्याचं उघड झालं आहे. ते अगदी सुखरूप आहेत. ते आता थोड्या वेळाआधीच एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचा एक व्हिडिओही आमच्या हाती लागला आहे. त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याचा हा व्हिडिओ  पाहा.

या अफवेमुळे उलट माझं आयुष्य उलट वाढलं आहे, असं गुलाटी म्हणाले.

लाल मिरची पावडरपासून ते सांबार मसाल्यापर्यंत.. प्रत्येक स्वयंपाकघरात वर्षोनवर्षे हक्काने विराजमान झालेले एमडीएच मसाले आणि त्याच्या जाहिरातींमध्ये झळकणारे फेटेवाले ते आजोबा प्रत्येकाच्या स्मरणात आहेत.

गुलाटी यांना लोक 'महाशयी जी' नावाने ओळखायचे.  1923 मध्ये त्यांचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला आहे.

विशेष म्हणजे, 95 वर्षांच्या धरमपाल यांनी गेल्या वर्षी रेसमध्ये  गोदरेज कन्झ्युमरचे सीईओ आदी गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता आणि आयटीसीचे वाय सी देवेश्वर यांची कमाईही गुलाटी यांच्यापेक्षा कमी होती.

'महाशियां दी हट्टी' ही कंपनी 'एमडीएच' या नावाने प्रसिद्ध आहे. फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या एकूण समभागांपैकी 80 टक्के हिस्सा होता. 95व्या वर्षीही ते अगदी न चुकता कारखान्यात, बाजारात जातात आणि डीलर्सनाही भेटतात, अगदी रविवारीही.

कष्टाचं पाणी करत स्थापन केलेल्या या कंपनीची  924 कोटी वार्षिक कमाई आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. धरमपाल गुलाटी यांच्या सहा दशकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज एमडीएचनं मसाल्याच्या बाजारात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.

धरमपाल गुलाटी; सीईओ, एमडीएच मसाले

जन्म : 27 मार्च 1923

जन्म ठिकाण : सियालकोट, पाकिस्तान

शिक्षण : चौथी पास

फाळणीनंतर नवी दिल्लीत स्थायिक

एमडीएच मसाले कंपनी वाढवली

60 पेक्षा जास्त उत्पादनं

100 पेक्षा जास्त देशांत निर्यात

वर्षाचा पगार 21 कोटी

90 टक्के पगार सामाजिक कामांसाठी खर्च

दोघांनी एका तरुणाला दगडांनी केली मारहाण, धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद

First published: October 7, 2018, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading