MBBS च्या विद्यार्थिनीला मध्यरात्री पार्कमध्ये नेऊन डॉक्टरने केले लैंगिक शोषण

MBBS च्या विद्यार्थिनीला मध्यरात्री पार्कमध्ये नेऊन डॉक्टरने केले लैंगिक शोषण

नवी मुंबईतील वाशी येथील म्यूनिसिपल कॉलेजच्या सीनियर डॉक्टरवर एका इंटर्नने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. डॉक्टरने मध्यरात्री पीडितेला बहाण्याने पार्कमध्ये बोलावून बिअर पाजली. नंतर तिचे लैंगिक शोषण केले.

  • Share this:

मुंबई, 6 जून- नवी मुंबईतील वाशी येथील म्यूनिसिपल कॉलेजच्या सीनियर डॉक्टरवर एका इंटर्नने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. डॉक्टरने मध्यरात्री पीडितेला बहाण्याने पार्कमध्ये बोलावून बिअर पाजली. नंतर तिचे लैंगिक शोषण केले.

काय आहे हे प्रकरण?

पीडित विद्यार्थिनी नवी मुंबईतील नेरूळ येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तसेच ती मुंबई म्यूनिसिपल कॉलेजमध्ये इंटर्न म्हणून काम करते. तिने पोलिसांनी सांगितले की, 25 मेच्या रात्री आरोपी डॉक्टरने तिला जरूरी काम असल्याचे सांगून आपल्यासोबत नेले. आरोपी तिला बाइकवर बसवून हॉस्पिटलमागील पार्कमध्ये नेले. आरोपीने तिच्यासमोर बिअरच्या दोन बाटल्या संपवल्या. एवढेच नाही तर पीडितेलाही जबरदस्तीने बिअर पाजली. नंतर तिला जबरदस्तीने किस करत तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेने प्रसंगावधान राखत आरोपीला धक्का देत तिने तेथून पळ काढला. सकाळी तिने आपल्या सहकाऱ्यांना आपबिती सांगितली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डॉक्टराला अटक केली आहे.

आई –वडिलांनी कर्ज न फेडल्याने अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

आई-वडिलांनी 10 हजाराचे कर्ज न फेडल्याने अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचे डोळे काढण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेनं उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. मन सुन्न करणारी अशी ही घटना आहे. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पण, मुलीसोबत बलात्कार झाल्याची बातमी मात्र पोलिसांनी फेटाळून लावली आहे. याप्रकरणात 31 मे रोजी अडीच वर्षाच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.

आई –वडिलांवर होतं कर्ज

मुलीच्या आई – वडिलांवर 10 हजार रूपयाचं कर्ज होतं. त्यांना 10 हजाराचं कर्ज फेडता येत नव्हतं. त्यामुळे आरोपींनी अडीच वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं. या प्रकरणी 31 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. वैयक्तिक वादातून मुलीची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

VIDEO:पवार फक्त बारामतीचे नेते, प्रकाश आंबेडकरांचा टोला

First published: June 6, 2019, 5:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading