कल्याण डोंबिवलीच्या महापौरांचं नगरसेवकपद रद्द

कल्याण डोंबिवलीच्या महापौरांचं नगरसेवकपद रद्द

राजेंद्र देवळेकर यांनी 2010 ला वैश्य वाणी जात लावली तर 2015 ला वाणी जात लावली या दोन वेगवेगळ्या जाती आहेत असा अर्जुन म्हात्रेचा दावा आहे.त्याविरुद्ध हायकोर्टात एक वेगळी केस सुरू आहे

  • Share this:

कल्याण,29 नोव्हेंबर:  कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कल्याण सत्र न्यायाल्याने दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.याआधीही 2012 साली देवळेकर यांना आपलं नगरसेवक पद गमवाव लागलं होतं.

वैश्य वाणी समाजाला ओबीसी मधून वगळण्यात आल्यानं आपोआपच त्यावेळी त्यांचं नगरसेवकपद सुद्धा रद्द झालं होतं. मात्र पुन्हा 2015 साली झालेल्या निवडणुकीत देवळेकर निवडणूक लढले आणि जिंकून आले. याला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अर्जुन म्हात्रे यांनी न्यायाल्यात आव्हान दिले. एकदा नगरसेवक पद रद्द झाल्यावर 6 वर्ष निवडणूक लढता येत नसूनही पुन्हा वाणी ही जात लावून निवडणूक लढवणे हे बेकायदा असल्याचा दावा करत म्हात्रे यांनी कोर्टात धाव घेतली होती.

दरम्यान  या निर्णयाला सत्र न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्यासाठी  एक महिन्याची स्थगिती दिली असून उच्च न्यायालयात या विरोधात जाणार असल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्पष्ट केलं.

याबद्दल विचारलं असता राजेंद्र देवळेकर  म्हणाले, ' कल्याण न्यायालयाने माझी निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिला आहे. परंतु त्याच  न्यायालयाने या निर्णयास अपील पिरियड पर्यंत म्हणजेच मा.उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात मला स्थगिती मिळेल असा विश्वास आहे'.

त्यामुळे  आता देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द होतं की त्यांना हाय कोर्टात नवसंजीवनी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 07:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading