बाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड

बाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड

मावळमधील गणेशभक्तांनी तिकोनागडावर गणेशोत्सवाची सुरुवात केलीये. टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत गडावर गणरायची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीये.

  • Share this:

मावळ, 16 सप्टेंबर : गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं त्याचबरोबर गडकोटांबद्दल आदर आणि तिथे चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी मावळमधील गणेशभक्तांनी तिकोनागडावर गणेशोत्सवाची सुरुवात केलीये. टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत गडावर गणरायची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीये. बाप्पाच्या आगमनाप्रसंगी तिकोनागड गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमुन गेला होता.

गडकिल्ल्यांवर चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं. गडकोटांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर निर्माण व्हावा, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी एक प्रयत्न म्हणून किल्ले तिकोणागडावर, तिकोणा पेठ ग्रामस्थ आणि मावळ परिसरातील शिवभक्तांनी या वर्षी पासुन गणेशउत्सवाची सुरुवात केलीय. गडावर गणेशाचं पारंपारीक पद्धतीने आगमन झालं. गणेशाच्या स्वागता करीता मावळे, अब्दगीरी, भगवा झेंडा, असं तयार होतं. टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत गणेशाचं गडावर आगमन झालं. बाप्पांची विधीवत पुजा करण्यात आली. नंतर वितंडेश्वराच्या मंदिरातही पूजा करण्यात आली.

 शुटींगच्या रात्री मिळाली बॉडी मसाजची ऑफर - राधिका आपटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2018 08:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading