Home /News /maharashtra /

विधानसभेनंतर मावळमध्ये पुन्हा सुनील शेळके आणि बाळा भेगडे आमने-सामने

विधानसभेनंतर मावळमध्ये पुन्हा सुनील शेळके आणि बाळा भेगडे आमने-सामने

सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे.

    अनिस शेख, मावळ, 9 जानेवारी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आले. मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर सुनील शेळके यांनी आमदार म्हणून मावळातून विजय मिळवला. परंतु तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढलेली असताना सुद्धा सुनील शेळके यांनी आपल्या रिक्त झालेल्या जागेवर भावकीतील महिला उमेद्वार सुनीता शेळके यांना अपक्ष उमेद्वार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. सुनीता शेळके यांना राष्ट्रवादी पुरस्कृत करत काँग्रेस आणि शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून नाना पटोलेंनी मांडला ठराव, फडणवीसही झाले अवाक सुनीता शेळके यांना भाजपच्या कृष्णा म्हाळसकर यांनी आव्हान दिलं आहे. आज मतदान झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे. एकीकडे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तर दुसरीकडे विद्यमान आमदार सुनील शेळके या दोघांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयश्री कोण खेचून आणत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरेंसोबत भेटच झाली नाही, देवेंद्र फडणवीसांनी केला 'मनसे' दावा दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्यात भाजपमध्ये बंडखोरी झाली. भाजपने पुन्हा एकदा बाळा भेगडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने सुनील शेळके यांनी पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांना तिकीटही जाहीर केलं. या निवडणुकीत सुनील शेळके यांनी राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडे यांचा 90 हजारांहून अधिक मतांनी पराभव करत राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, NCP

    पुढील बातम्या