मावळमध्ये राष्ट्रवादीचा पलटवार, भाजपला मोठा धक्का

उमेदवारांच्या घोषणेनंतर भाजपला मोठ्या बंडाळीचा सामना करावा लागत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 02:40 PM IST

मावळमध्ये राष्ट्रवादीचा पलटवार, भाजपला मोठा धक्का

अनिस शेख, मावळ, 3 ऑक्टोबर : निवडणुकीपूर्वी जोरदार इन्कमिंग झाल्यानंतर आता उमेदवारांच्या घोषणेनंतर भाजपला मोठ्या बंडाळीचा सामना करावा लागत आहे. मावळमध्येही भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत. पक्षातील एका इच्छुकाने तिकीट न मिळाल्याने थेट राष्ट्रवादीची वाट धरली आहे. तर दुसऱ्या नेत्याने निवडणुकीत अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाने मावळमध्ये पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे तिकीट नाकारलेल्या सुनील शेळके यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधलं. सुनील शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारीही दिली आहे. तर दुसरीकडे, तालुक्यात दोन टर्म आमदार असलेले दिगंबर भेगडे यांचा पुतण्या रवींद्र भेगडे यांनाही पक्षाकडून डावललं गेल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली.

माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी पुतण्या रवींद्र भेगडे यांना मावळ मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मावळमध्ये बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके विरुद्ध रवींद्र भेगडे असा तिरंगी समाना रंगणार आहे.

माळशिरसमध्येही राष्ट्रवादीने टाकला डाव

राष्ट्रवादी काँग्रेसने माळशिरस येथून धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना संधी दिली आहे. जानकर हे भाजपच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.

Loading...

हेही वाचा - राज्याच्या राजकारणाला कलाटणी, बीडचा दौरा रद्द करून अजित पवार खडसेंच्या भेटीला?

पण विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीतून भाजपच्या जवळ गेल्याने त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने जानकरांना आपल्याकडे खेचलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपसमोर आव्हान निर्माण झालं आहे.

राष्ट्रवादीची दुसरी यादी, कुणाला मिळाली संधी?

जळगाव शहर - अभिषेक पाटील

बाळापूर - संग्राम गुलाबराव गावडे

कारंजा - प्रकाश डहाके

मेळघाट - केवळराम काळे

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

दिग्रस - मो. तारीक मो. शमी

गंगाखेड - मधूसुदन केंद्रे

कन्नड - संतोष कोल्हे

नांदगाव - पंकज भुजबळ

बागलाण - दीपिका चव्हाण

देवळाली - सरोज अहिरे

कर्जत - सुरेश लाड

खेड आळंदी - दिलीप मोहिते

मावळ - सुनील शेळके

पिंपरी - सुलक्षणा शिलावंत

आष्टी - बाळासाहेब आजबे

माढा - बबनदादा शिंदे

मोहोळ - यशवंत माने

माळशिरस - उत्तमराव जानकर

चंदगड - राजेश पाटील

कुणा विरुद्ध कोण लढणार? या आहेत BIG FIGHTS, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...