परभणीत नमाझ अदा करण्यासाठी जमलेल्या मौलवीसह 17 जणांवर गुन्हा

परभणीत नमाझ अदा करण्यासाठी जमलेल्या मौलवीसह 17 जणांवर गुन्हा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

  • Share this:

परभणी, 27 मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असताना मशिदीमध्ये नमाझ अदा करण्यासाठी जमलेल्या जमावाच्या विरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, जिल्ह्यात पोलिस मौलवी यांनी या अगोदरच बैठक घेऊन आजची नमाझ घरीच अदा करण्याचे ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार काल रात्री, संपूर्ण शहरभर पोलिसाचा गाडीवर ही सूचना पोहोचण्यात देखील आली होती. परंतु आज शहरातील शाही मशिदीत मात्र, मोठ्या संख्येने जमाव जमला. जमावबंदीचे आदेश असतानाही हा प्रकार झाल्याने प्रशासनाने यावर कडक पावले उचलली, मशिदीत जमलेल्या मौलवी आणि इतर 17 जणांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा...कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या पुण्यातल्या सिस्टरला थेट नरेंद्र मोदींचा फोन

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण 17 नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे 12 रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 153 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लगण झाली आहे.

घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाची लागण

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्चला हिंदुजा रुग्णालयात एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोनाव्हायरसचं थैमान जगभरात आता पुढच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट आहे. 5 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे आणि मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे.

हेही वाचा...अरे माणुसकी मेली का तुमची? 'कोरोना'च्या अफवेने महिला पोलीस कुटुंबावर बहिष्कार

मुंबईत आज सापडलेल्या 9 कोरोनाग्रस्तांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष आहेत. यातल्या तिघांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात तर 6 जणांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. भारतात आतापर्यंत 724 रुग्ण सापडले असून त्यातले 66 बरे झाले आहेत, तर 17 मृत्युमुखी पडले आहेत. त्यातले 5 मुंबईतले आहेत.

हेही वाचा...मनसेचे आमदार म्हणाले, क्वारंटाईन लोक बाहेर फिरताना दिसल्यास जेलमध्ये टाका

दुसरीकडे आज सांगलीमध्ये एकाच दिवसात तब्बल 12 जणांना लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण सांगलीत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा हा 23 वर पोहोचला आहे. तर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 153 वर पोहोचली आहे.

सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरात राहणाऱ्या आणखी 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. यामध्ये तब्बल 12 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

First published: March 27, 2020, 11:36 PM IST

ताज्या बातम्या