100 % महिला कर्मचारी असणारं माटुंगा स्थानक लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये!

100 % महिला कर्मचारी  असणारं  माटुंगा स्थानक लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये!

जुलै २०१७ रोजी ३४ महिलांची नियुक्ती करून हे स्थानक महिला विशेष स्थानक घोषित करण्यात आलं. माटुंगा स्थानकाजवळ विविध महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ येथे सर्वाधिक असते. यामुळे स्थानकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे महिला अधिकारी कर्मचा-यांची मागणी करण्यात आली होती

  • Share this:

08 जानेवारी: महिला विशेष असलेल्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली आहे. स्थानकातील विविध कामांसह स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला अधिकारी कर्मचारी यांच्यावर आहे. याची दखल आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. महिलांमार्फत कामकाज करणारं स्थानक म्हणून देशातील पहिले उपनगरीय रेल्वे स्थानकाचा मानदेखील माटुंगा स्थानकाला मिळाला आहे.

जुलै २०१७ रोजी ३४ महिलांची नियुक्ती करून हे स्थानक महिला विशेष स्थानक घोषित करण्यात आलं. माटुंगा स्थानकाजवळ विविध महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ येथे सर्वाधिक असते. यामुळे स्थानकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे महिला अधिकारी कर्मचा-यांची मागणी करण्यात आली होती. माटुंगा स्थानकावर सद्य:स्थितीत २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षकांसह ११ तिकीट बुकिंग क्लार्क, ७ तिकीट तपासनीस, अन्य कामांसाठी ५ कर्मचारी आणि २ उद्घोषणा करणाऱ्या महिला यांचा समावेश आहे. स्थानक-प्रवासी सुरक्षिततेसाठी आरपीएफच्या ५ महिला अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.

First published: January 9, 2018, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading