अमन लॉज ते माथेरान मिनीट्रेन पुन्हा सुरू

अमन लॉज ते माथेरान मिनीट्रेन पुन्हा सुरू

शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना 1 नोव्हेंबरला नेरळ स्थानकात रेलरोको करू, असा इशारा द्यावा लागला. मग चक्रं फिरली आणि काम सुरू झालं. नेरळ माथेरान ट्रेन सुरू व्हायला अजून थोडा वेळ लागणार आहे, कारण इंजिनच नाहीय

  • Share this:

30 ऑक्टोबर: अमन लॉज ते माथेरान मिनीट्रेनची शटल सेवा आजपासून पुन्हा सुरू होतेय. गेले दीड वर्षही सेवा बंद होती.

शटल बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटनावर होऊ लागला होता. पण रेल्वे प्रशासन हलत नव्हतं. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना 1 नोव्हेंबरला नेरळ स्थानकात रेलरोको करू, असा इशारा द्यावा लागला. मग चक्रं फिरली आणि काम सुरू झालं. नेरळ माथेरान ट्रेन सुरू व्हायला अजून थोडा वेळ लागणार आहे, कारण इंजिनच नाहीय. पण एकदा माथेरानला पोहोचल्यावर अमन लॉज ते माथेरान मार्केट हा मार्ग आज पुन्हा खुला होतोय.

गेल्या मे महिन्यात  नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवा बंद पडली होती. आणि त्याआधीच अमन लॉज ते माथेरान शटल सेवा बंद पडली होती. सारे माथेरानकर एकवटून मंत्री आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटून अर्ज विनंती करूनही कोणीही दाद मिळत नसल्याने माथेरानची वेगळी ओळख असलेली मिनिट्रेन सेवा बंद पडल्याने माथेरानच्या पर्यटनावर याचा विपरीत परिणाम झाला होता. हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मध्य रेल्वेच्या नेरळ येथे 1 नोव्हेंबरला रेल रोको करण्याचा इशारा दिल्याने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन करून शटल सेवा सुरू करण्याचे ठरवलं असून आता नेरळ माथेरान सेवा इंजिन अभावी बंद राहणार आहे. मात्र ही सेवा इंजिन उपलब्ध होताच तीही सुरू होणार असल्याची माहिती माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी दिली आहे.

First published: October 30, 2017, 10:21 AM IST

ताज्या बातम्या