माथाड्यांचा गिरणी कामगार करण्याचा सरकारचा घाट; राज्यभरात माथाडी कामगारांचा सरकारविरोधात बंद!

माथाड्यांचा गिरणी कामगार करण्याचा सरकारचा घाट; राज्यभरात माथाडी कामगारांचा सरकारविरोधात बंद!

आजच्या बंदचा फटका राज्यातील कृर्षी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी कंपन्या आणि रेल्वे मालवाहतुकीवर होणार आहे. हा एकदिवसीय बंद असणार आहे.

  • Share this:

30 जानेवारी : आज राज्यभरात माथाडी कामगारांनी बंद पुकारला आहे. आजच्या बंदचा फटका राज्यातील कृर्षी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी कंपन्या आणि रेल्वे मालवाहतुकीवर होणार आहे. हा एकदिवसीय बंद असणार आहे. यावर सरकारनं योग्य निर्णय नाही घेतला तर आंदोलन तीव्र करीत पुढील टप्यात विधानभवनावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचं माथाडी कामगारांकडून सांगण्यात आलं आहे.

माथाडी बोर्डाचे अधिकार काढून मंडळ स्थापन करण्याचा घाट सरकारचा आहे. असे झाल्यास हे मंडळ सरकारच्या अखत्यारीत येवून मालकधार्जीण्य निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकारचा हा माथाडी कायदा मोडीत काढण्याचा डाव आहे. याच्या विरोधात राज्यातील सर्वं माथाडी संघटना एकत्रीत आल्या आहेत. अशी टिका माथाडी कामगारांकडून सरकारवर करण्यात आली आहे.

राज्यातील माथाडी कायद्याला सुरूंग लावत माथाडी कामगारांचा गिरणी कामगार करण्याचा घाट युती सरकारने घातला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील सर्व 36 माथाडी संघटनांनी महाराष्ट्र बंद ठेवलाय. कंपनी, उद्योग धंद्यामध्ये माथाडी कामगार कायदा सद्या लागू आहे. माथाडींच्या कायद्यामुळे माथाडी कामगारांना काम मिळत, सोबतच संरक्षणही मिळत आहे. मात्र आता सरकार या कायद्यामध्ये बदल करीत असल्यानं माथाडी कामगार देशोधडीला लागणार आहे. याच सगळ्याच्या पार्श्वभूमिवर आजचा बंद पुकारण्यात आला आहे. आता यावर सरकार काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे.

First published: January 30, 2018, 8:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading