बापासारख्या मामाने अनेकदा केला बलात्कार, अखेर अल्पवयीन भाचीने फिरवला 100 नंबर आणि...!

बापासारख्या मामाने अनेकदा केला बलात्कार, अखेर अल्पवयीन भाचीने फिरवला 100 नंबर आणि...!

पीडित मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहत असताना तिच्यावर मामाने चार वेळा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मामाचा हा अत्याचार वाढत गेल्याने पीडित मुलीने ही घटना पालकांना सांगण्याऐवजी थेट पोलिसांमध्ये 100 नंबरला कॉल करून सांगितली.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

आंबेगाव, 23 डिसेंबर : मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. मामाकडे शिक्षणासाठी असलेल्या अल्पवयीन भाचीवर मामानेच बलात्कार केल्याची घटना घडली असून नराधम मामाचा अत्याचार वाढून त्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलीने मामाची तक्रार थेट 100 नंबर कॉल वरून करून दिली. त्यानंतर मंचर पोलिसांनी आजीच्या तक्रारीवरून नराधम मामाच्या मुसक्या आवळल्या.

पीडित मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहत असताना तिच्यावर मामाने चार वेळा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मामाचा हा अत्याचार वाढत गेल्याने पीडित मुलीने ही घटना पालकांना सांगण्याऐवजी थेट पोलिसांमध्ये 100 नंबरला कॉल करून सांगितली. या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे आणि मंचर पोलीस यांनी पीडित मुलीच्या आजीची तक्रार नोंदवून 376, 323, 506 कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी नराधमाला मामाला अटक केली आहे.

सध्या समाजात विकृतीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना यामध्ये महिला, मुली त्यांच्यावरील अत्याचार वाढत चालले आहेत. एकीकडे "मुलगी वाचवा देश वाचेल" असे नारे दिले जातात त्याच पुरोगामी महाराष्ट्रात नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहे. त्यामुळे हा समाज कुठल्या दिशेला चाललाय याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिकमध्येही बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इतर बातम्या - साध्या हिरो होंडाची झाली सिंघम बाईक, वाचा तरुणांचा भन्नाट प्रयोग

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन नाशकात विवाहितेवर बलात्कार, मोबाइलमध्ये केले चित्रिकरण

आदिवासी भागातील सुरगाणा येथे 19 वर्षीय गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असताना विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. विवाहितेला भेटण्याचा बहाणा करत तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

एवढेच नाही तर नराधमाने मोबाइलमध्ये अश्लील चित्रिकरण करून तिला बदनामीची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बाळू गिरीधर जाधव या संशयितावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत ओळखीचा संशयित बाळू जाधव याने भेटण्याचा बहाणा करत पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये नेले. तेथे शीतपेयात गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले.

इतर बातम्या - या 4 रेल्वे स्थानकावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे

शुद्ध आली तेव्हा हॉटेलमध्ये संशयिताने बलात्कार केल्याचे समजले. याबाबत जाब विचारला असता संशयिताने हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये चित्रित केल्याचे सांगितले. नकार दिला अथवा कुणाला काही सांगितले तर नातेवाईक, पतीला हे चित्रीकरण पाठवण्याची धमकी देत परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. मोबाइल चित्रिकरण डिलिट करण्यासाठी वेळोवेळी पैसे घेतले.

याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पीडितेने सांगितल्यानंतर संशयिताने तुझा संसार मोडून समाजात बदनामी करतो, अशी धमकी दिली. वेळोवेळी शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ होत असल्याने पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी धीर देत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताच्या विरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या - 23व्या वर्षीच कमवतो 89 लाख, हे काम शिकण्यासाठी तुम्ही कोणाची वाट पाहताय?

Tags:
First Published: Dec 23, 2019 10:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading