5 राज्यांच्या निवडणुकांसाठी अमित शहांचा 'हा' आहे स्पेशल प्लॅन

5 राज्यांच्या निवडणुकांसाठी अमित शहांचा 'हा' आहे स्पेशल प्लॅन

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपनं महाराष्ट्रातील आमदार खासदारांची टीम सज्ज केली आहे. उद्या या नेत्यांना प्रचाराची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 08 ऑक्टोबर : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपनं महाराष्ट्रातील आमदार खासदारांची टीम सज्ज केली आहे. उद्या या नेत्यांना प्रचाराची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. आमदार, खासदारांसोबत भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी या राज्यात प्रचारासाठी जाणार आहेत.

मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. मिनी लोकसभा या दृष्टीने भाजपनं पूर्ण ताकदीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी महाराष्ट्रामधील आमदार आणि खासदार प्रचाराला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदार आणि खासदार यांच्यासोबतच भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी आपल्या मूळ राज्यात प्रचारात कायमस्वरूपी असतील. गुजरात निवडणुकीप्रमाणे भाजपची सर्वाधिक मदार ही मुंबईच्या हिंदी भाषिक नेते आणि आशिष शेलार यांच्यावर असेल हे मात्र नक्की.

महाराष्ट्र भाजपची प्रचाराची फौज

- एकनाथ खडसे, संभाजी राजे आणि पश्चिम महाराष्ट्र नेत्यांना मध्य प्रदेशची जबाबदारी

- मुंबईतल्या उत्तर भारतीय नेत्यांकडे छत्तीसगडची जबाबदारी

- आशिष शेलार, जयकुमार रावल यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी

- सुधीर मुनगंटीवार आणि नागपूरच्या आमदारांकडे तेलंगणाची जबाबदारी

- मिझोरमची जबाबदारी भाजप विचाराशी संलग्नित संघटनांकडे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये सभा

या चारही राज्यांतील निवडणुकांची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

छत्तीसगडमधील निवडणुका या दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान हे नक्षलग्रस्त परिसरातील १८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला होईल. तर इतर जागांचं मतदान हे २० नोव्हेंबरला होणार आहे.

मध्यप्रदेशमधील २३० जागांसाठी आणि मिझोरमच्या ४० जागांसाठी एकाच दिवशी २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्यप्रदेश आणि मिझोरमप्रमाणे तेलंगणा आणि राजस्थानमध्येही एकाच टप्प्यात निवडणुका होतील.

राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला मतदान होईल. ११ डिसेंबरला पाचही राज्यांची मतमोजणी होईल.

तेलंगणामध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार होत्या. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळेआधीच विधानसभा बरखास्त केली. ज्यामुळे तेलंगणामध्ये विधानसभेच्या ठरलेल्या वेळेआधीच निवडणुका होतील. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांआधी या पाच राज्यांतील निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत.

या निवडणुकांमध्ये लागणाऱ्या निर्णयांचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपची सत्ता आहे. तर मिझोरममध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचं सरकार आहे.

VIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच!

First published: October 8, 2018, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading